वरखेडच्या विद्यार्थ्यांनी गाजवली भारत टॅलेंट सर्च परीक्षा; राज्य व जिल्हा स्तरावर मिळवले दैदिप्यमान यश
चिखली (प्रतिनिधी):भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, वरखेड येथील विद्यार्थ्यांनी बौद्धिक कौशल्याच्या जोरावर ‘भारत टॅलेंट सर्च’ (BTS) या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या जगात घेतलेली ही झेप शाळा आणि परिसरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
स्पर्धा परीक्षेत बुद्धिमत्तेची चुणूक
राज्यस्तरीय स्तरावर आयोजित या परीक्षेत शाळेच्या सर्वच इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये इयत्ता तिसरीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केवळ सहभागच घेतला नाही, तर गुणांची मोठी कमाई करत राज्य आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आपली वर्णी लावली आहे. विशेषतः तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी १३० पेक्षा जास्त गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शाळेतील विविध इयत्तांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
*इयत्ता सातवी: अमृता गुंड (१२२ गुण) आणि रिद्धी जाधव (१२० गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्यासोबतच भक्ती कड (११८ गुण) आणि श्रूती म्हळसने (११६ गुण) यांनीही उत्तम गुण प्राप्त केले आहेत.
*इयत्ता सहावी: काकडे प्रसेनजित आणि डोंगरदिवे अनुराग यांनी प्रत्येकी १२६ गुण मिळवून वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच चिचोले सेजल, तांबट श्रावस्ती आणि जाधव समीर यांनी प्रत्येकी १२४ गुणांसह यश मिळवले आहे.
इयत्ता पाचवी:कृष्णली गणेश सोळंके हिने १३६ गुणांसह शाळेतून सर्वाधिक गुणांची नोंद केली आहे, तर मोरे स्वरा हिने १३० गुण मिळवले आहेत.
*इयत्ता चौथी: आदर्श घुबे ७४ गुणांसह यशस्वी ठरला आहे.
इयत्ता तिसरी:पाटील निधी भागवत हिने १३० गुणांची कमाई करत चमकदार कामगिरी केली असून जवळंजाळ आरुषी हिने ९० गुण प्राप्त केले आहेत.
यशाचे श्रेय आणि कौतुक
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन कारणीभूत आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भगत व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक शरद बंगाळे शिक्षक शुभम बुरकुल दयालसिंग जाधव ,भागवत पाटील, मंगेश झगरे ,गजानन आहेर ,अहिरे सर, चौरे सर, ठाकरे सर, फितवे खरात सर सोरमारे सर ठेंग सर शेजोळ सर आणि पालक वर्ग यांच्याकडून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सर्व स्तरातून या गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

I was looking for a trustworthy online casino and found exactly what I needed here. The slot games have amazing graphics and the live dealer tables feel completely immersive. Payouts are quick and I never had to wait too long for verification. It feels like a premium club right in my pocket. vnzx88casino