
चिखली (प्रतिनिधी) दि.२०: लोकुत्तरा महाविहार भालगाव ते लोकुत्तरा महाविहार चौका पदयात्रेचा समारोप अत्यंत उत्साहात सपन्न झाला. या पदयात्रेमध्ये पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 11 दिवस पायी चालत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला
150 किलोमीटर पायी प्रवास करत ग्रामीण भागातील जनतेला उपदेश दिला. यावेळी धम्माची जागृती भिक्खूसंघाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. या पदयात्रेमध्ये पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो, भदंत धम्मानंद,भदंत संघपाल,भदंत विनयशील,भदंत राहुलो,भदंत धम्मरतन भंते आर्यनाग सहभागी होते. लोकुत्तरा महाविहार भालगाव शाखा भदंत राहुलो (मुख्य आयोजक) मुख्य आयोजक होते. या पायी पदयात्रेचा समारोप त्रिशरण पंचशील देऊन करण्यात आला.
या सर्व नियोजनावर आणि पदयात्रेच्या आयोजनावर उपस्थित बौद्ध अनुयायांनी आनंद व्यक्त केला.यावेळी सर्व समिती भिक्खूसंघाचे अभिनंदन करण्यात आले . उपस्थित सर्व उपासक उपासिका भंते यांनी आशीर्वाद दिले.
पदयात्रेचा समारोप अत्यंत समाधानकारक झाला आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची पदयात्रा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला .याप्रसंगी आयु. मंदाकिनी लेमाडे, संगीता पाखरे, आर आर लेमाडे, शोभा प्रधान, खिल्लारे ताई, आर ओ इंगळे, , दादा वाकोडे, माघाडे आई, संदीप काळे, पूजा कसबे, राजेंद्र गायकवाड, मायादेवी रत्नपारखे, संजय इंगळे फुलंब्री, निर्मला देवेंद्र गवई, पद्माबाई साळवे, प्रतिभा प्रशांत जोगदंड, वंदना खरात, रोडगे ताई, वाहूळताई, बिजलाबाई गडवे, चंद्रमणी पगारे, राजेंद्र नन्नावरे, रेखा शिरसाठ, काजल साळवे, प्रियंका प्रकाश जाधव,निर्मला तेजराव गवई, मीना नामदेव वानखेडे, अर्चना वाकळे, शीला पुंडगे, कुसुम माटे, सिंधू साळवे, सुंदराबाई गायकवाड, ताराबाई बनकर, शैला पोटभरे, विश्वंभर लोणे, सुदाम इंगळे, रोहिणी बोर्डे, कमल नरवडे, सामिंद्र जमधाडे, आर के इंगळे, रेखा शिरसाठ, कविता दाणे, संगीता थोरात, अशोक बनकर,आणि मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.


