mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Triple motorcycle accident on Shegaon Lohara Road

Two youths killed, one seriously injured: शेगाव लोहारा रोडवर मोटरसायकलचा तिहेरी अपघात, दोन युवक मृत्युमुखी तर एक गंभीर जखमी

पोलीस प्रशासनाने भरधाव वेगावरील वाहनावर नियंत्रण ठेवण्याची गरज

देवचंद्र  समदुर

 शेगाव (प्रतिनिधी) : शेगाव लोहारा रोडवरील हॉटेल ओमकार नजीक दि.11 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास भरधाव मोटार सायकलचा तिहेरी अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये सोहम दिलीप शेगोकार वय 27 वर्ष राहणार जावई नगर शेगाव हे जागेवरच ठार झाले तर अमोल दादाराव गावंडे वय 30 वर्ष राहणार गोळेगाव बुद्रुक याचा  उपचारादरम्यान अकोला येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. तर एक गंभीर अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे 

 दिवसेंदिवस मोटरसायकलच्या अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे यामध्ये अनेक मोटरसायकल ह्या अति वेगवान पद्धतीने चालविल्या जातात ज्यामुळे अपघात होतात यामध्ये काही नाहक नागरिकांचा बळी जात आहे .शेगाव तालुक्यात इतर वाहनांच्या तुलनेत मोटरसायकलचे प्रमाण जास्त आहे .अनेक मोटार सायकल धारकांकडे लायसन्स नाहीत तर अनेकांकडे गाडीचे कागदपत्रे पूर्ण  नाहीत यामध्ये अल्पवयीन बालकांचे मोटर सायकल चालवण्याचे  प्रमाण जास्त आहे अनेकांना तर ट्राफिक नियम माहीतच नाहीत त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करून ज्यामध्ये लायसन्स गाडीची कागदपत्रे भरधाव वेग  अल्पवयीन युवक चालवत असलेली मोटार सायकल यांच्यावर कार्यवाही करावी .पोलिसांनी वाहनधारकांवर नियंत्रण ठेवून होणारा अपघाती अनर्थ टाळावा अशी नागरिकांची मागणी होत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top