mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Queue for gas cylinders at Indane Gas Agency; Citizens panic on Padwa dayRaw receipts given: Citizens swelter in the sun due to site problem :इंडेन गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडरसाठी रांग ; पाडव्याच्या दिवशी नागरिक हैराण

कच्च्या पावत्या दिल्या: साईट प्रॉब्लेममुळे नागरिक उन्हात ताटकळत 

बुलढाणा/ प्रतिनिधी

एकेकाळी घरपोच गॅस सेवा देणारी  बुलढाणा येथील इंडेन गॅस एजन्सी सध्या मात्र नागरिकांच्या रोषाला सामोरी जात आहे. अगोदर सहजपणे घरपोच मिळणारा गॅस आता मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज पाडव्याच्या सणाच्या दिवशीही गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याने अनेक कुटुंबांचा सण अंधारात जाण्याची वेळ आली आहे. ‘बुकिंग करूनही २४ तास गॅस मिळणार नाही, असे एजन्सीकडून सांगितले जात आहे,’ अशी तक्रार केशरबाई हिवाळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एजन्सीकडून कच्च्या पावत्या दिल्या जात असल्याची बाबही समोर आली आहे. ‘साईट प्रॉब्लेम’चे कारण देत ग्राहकांना दोन ते तीन तास थांबण्याचे संकेत दिले जात आहेत. परिणामी, एजन्सीसमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या गैरसोयीमुळे नागरिकांचा रोष अधिकच वाढला आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top