
चिखली/ प्रतिनिधी
जि. प. उच्च प्राथमिक शाळा साकेगांव येथील विद्यार्थी सम्यक निकाळजे ह्या विद्यार्थ्याने नवोदय विद्यालय परीक्षेत 96.25 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, पालक, शिक्षक आणि संपूर्ण गावाचा मान उंचावला आहे. या निकालात उत्कृष्ट कामगिरी करत शाळेची गुणवत्ता अधोरेखित केली. शाळेचे नाव उंचावले आहे. त्याच्या घरची परिस्थिती जेम तेम असूनही, त्याच्या आईवडिलांनी मोल मजुरी करून त्याला चांगले शिक्षण मिळवून दिले आहे.
सम्यकचे यश हे त्याच्या परिश्रम आणि त्याच्या आईवडिलांच्या सपोर्टचे प्रतीक आहे. सम्यक या नावाचा अर्थ चांगले परिपूर्ण चांगुलपणा आणि परिपूर्णतेचे प्रतीक मानले जाते. त्याच्या नावाप्रमाणे प्रमाणे सम्यक ने आपल्या यशाला गवसनी घातली आहे. एका खेडे गावातील जि. प. शाळेचे विद्यार्थी हे कोणापेक्षा कमी नसतात हे त्याने दाखवून दिले आहे.त्याचा हा आदर्श इतरही विद्यार्थ्यांनी घ्यावा. सम्यक सुरेखा समाधान निकाळजे याची नवोदय विद्यालय शेगाव साठी निवड झाल्यामुळे त्याच्या वर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे


