
बुलडाणा (प्रतिनिधी ): तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित राजमाता माॅ जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट जिवन दिप अनाथ आश्रम व वृधा आश्रम तथागत गृप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा जिल्ह्यातील आदर्श समाज सेवक मा अनंता अर्जुन मिसाळ यांना तथागत गृप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने २०२६ यंदाचा राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराने दि १२/४/२०२६ ला मेहकर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
अनंता मिसाळ हे बुलढाणा जिल्ह्यातील भादोला गावचे मूळ रहिवासी असून गेल्या २५/३० वर्षा पासून सामाज कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदत करत लोकांचे दुःख समजून समाजाभीमूख कार्य सतत करत असतात. अन्याय अत्याचार विरोधात ,आंदोलन,पाणी टंचाई, रक्तदान, आणि सर्व समाजाच्या सुख दु:खात हिरि – हिरी ने सह भाग घेवून कुठलाही स्वार्थ न ठेवता सेवाकार्य करत ,काव्य रचना करून तरूण पिढीला व्यासना पासून अलीप्त राहण्यासाठी प्रबोधन करत असतात,या पुर्वी अनेक सामाजिक संस्थेनेही त्यांना सन्मानीत केले आहे, आतापर्यंत राज्यस्तरीय सहा पुरस्कार प्राप्त असून, महाराष्ट्र भुषण वामन दादा कर्डक, समाज भुषण,कृषी भुषण, बहुजन रत्न, जलसाकार गवई मिसाळ पुरस्कार मिळाले आहेत .राष्ट्रीय स्तरावरील हा पहील्या राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व आप्तेष्ट, मित्र परिवारा मध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे जिल्हा भर कौतुक होत आहे . अनेकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत, यावेळी संस्थाअध्यक्ष मा .संदीप भाऊ गवई, कार्याध्यक्ष कुनाल माने,संदीप राऊत,स्नेहल वानखेडे,सविता मिसाळ,आसामा आत्राम,प्रा वाघ सर, पत्रकार रफीक भाई कुरेशी व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाई दिलीप खरात उपस्थित होते.त्यांनी निवड समिती चे जाहीर आभार मानले आहेत या प्रसंगी अनेक मान्य वरांची उपस्थिती होती.


