mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Show your hand, stop the car’ prank: The bus didn’t stop at the ST stop near Vijayalakshmi pump!: हात दाखवा, गाडी थांबवा’चा फज्जा: विजयालक्ष्मी पंपाजवळील ST स्टॉपवर बस थांबेनाच!

 सायंकाळी 7 नंतर बुलढाण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, वाहक-चालकाच्या मनमानीने प्रवासी संतप्त

खामगाव( प्रतिनिधी): दि.१४,“हात दाखवा, गाडी थांबवा” ही एस.टी. महामंडळाची घोषणा प्रत्यक्षात फोल ठरत आहे. विजयालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ(बायपास)  एस.टी. बस स्टॉप असूनही बुलढाण्याकडे जाणाऱ्या बसेस येथे थांबत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः सायंकाळी 7 वाजेनंतर कामावरून परतणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी व महिलावर्गाला तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

विजयालक्ष्मी पेट्रोल पंप, खामगाव हा बुलढाणा मार्गावरील महत्त्वाचा थांबा (बायपास) आहे. येथे जाणाऱ्या येणाऱ्या एसटी बस थांबते . मात्र प्रत्यक्षात खामगाव आगारातून सुटणाऱ्या व बुलढाण्याकडे जाणाऱ्या अनेक बसेस या थांब्यावर न थांबताच सुसाट वेगाने पुढे निघून जातात. प्रवासी हात दाखवून,आज सायंकाळी अमरावती बसला हात दिला असता,चालकांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहक हुशार गाडी फुल आहे चे कारण देऊन गाडी थांबवली  नाही.

प्रवाश्यांना चिखली  मार्गाने बुलढाणा पोहचावे लागले.विनंती करूनही चालक-वाहक दुर्लक्ष करतात, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.

प्रवासी राजा घरी जाणार कसा?” सायंकाळी ६.३०  वाजेच्या सुमारास खामगावहून बुलढाण्याला जाणाऱ्या बसेसची संख्या आधीच कमी असते. अशावेळी विजयालक्ष्मी पंपाजवळील थांब्यावर गाडी न थांबल्यास प्रवाशांना पर्यायी वाहन मिळणे कठीण होते. “दिवसभर काम करून दमलेल्या अवस्थेत घरी जाण्यासाठी बसची वाट पाहतो. पण बस थांबतच नाही. मग आम्ही जायचे कसे? खाजगी वाहनांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात,” अशी व्यथा प्रवाशांनी मांडल्या आहेत.

वाहक-चालकाची मनमानी?* 

“आम्ही हात दाखवला तरी बस थांबत नाही. कधी कधी वाहक खिडकीतून ‘पुढच्या स्टॉपवर जा’ असे सांगतो. बायपास थांबा असूनही अशी वागणूक म्हणजे निव्वळ मनमानी आहे,” असे काही प्रवाशांनी  यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी महिला सुरक्षेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे.

प्रवाशांची मागणी:

1.  विजयालक्ष्मी पंपाजवळील थांब्यावर सर्व बुलढाणा मार्गावरील बसेस सक्तीने थांबवाव्यात.2.  मनमानी करणाऱ्या चालक-वाहकांवर कारवाई करावी. 3.  सायंकाळी 7 ते 9 या वेळेत बुलढाण्यासाठी जादा बस फेऱ्या सोडाव्यात.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमानुसार अधिकृत बस थांब्यावर(बायपासवर)  हात दाखवल्यानंतर बस थांबवणे बंधनकारक आहे. विनाकारण बस न थांबवल्यास संबंधित.मनमानी करणाऱ्यावर चालक-वाहकावर शिस्तभंगाची कारवाई  करा.

सतीश पवार भीम आर्मी राज्य उपाध्यक्ष


Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top