
बुलढाणा (प्रतिनिधी): डिझेल टंचाई आणि दरवाढीमुळे शेतकरी हैराण झाला असताना भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.
सतीश पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, शेतकऱ्यांना डिझेल न दिल्यास संपूर्ण देशाला उपासमारीचा सामना करावा लागेल.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. ट्रॅक्टर घेऊन शेतकरी तासन् तास रांगेत उभे आहेत. नांगरणी, पेरणीची कामे खोळंबली आहेत.
“शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा ट्रॅक्टर थांबला तर अन्नधान्याचे उत्पादन थांबेल. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल पुरवठा करावा,” अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.
सतीश पवार यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर शेतकरी व तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत असून ती वेगाने व्हायरल होत आहे.
