उदयनगरात कडकडीत बंद

उदयनगर (प्रतिनिधी ): दि.२३जुलै देशात निट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत शांततेत सुरू असलेल्या आंदोलन विद्यार्थ्यांनी करत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना अमानुषपणे लाठीचार्ज करून जखमी केले तसेच 20 ऊन अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या व लाठीचार्ज मध्ये एक विद्यार्थिनी मृत्युमुखी पडली .याच्या निषेध म्हणून तसेच धर्मैद्र प्रधान राजीनामा द्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद चे हाक दिली आणि या हाकेला प्रतिसाद म्हणून चिखली तालुक्यातील उदयनगर येथे 23 जुलै रोजी सकाळी सात वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष संदीप अंभोरे त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष संजय धुरंधर तालुका उपाध्यक्ष रघुनाथ गवई यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात आला या बंदला प्रतिसाद म्हणून भाई प्रदीप अंभोरे म्हणून मुक्ती मोर्चा भाई मधुकर वानखडे व सिद्धांत वानखडे आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष जेष्ठ नेते गजानन धुरंधर,लाला सपकाळ, दिपक तायडे ,पवन गवई, काशीनाथ मोरे ,सरपंच अनंथा पैठणे, अमोल वाकोडे, भास्कर पैठणे, किरण कांबळे, अमोल धुरंधर, मिलिंद धुरंधर, दिपक अंभोरे, गुलाबराव अंभोरे, निलेश चिंचोले, तसेच परीसरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी व्यापारी भाजी पाला विक्रेता बहुजन समाजातील कार्यकर्ते पत्रकार बांधवांनी स्वयं पुर्तीने बंद मध्ये सहभागी झाले तसेच पोलिस प्रशासनाने विशेष सहकार्य केले.
