Students’ lives at risk; warning of agitation if immediate repairs are not carried out: करवंड येथील लेंडी धरण 100% भरले, श्रीकृष्णनगरचा पूल पावसात वाहून गेला
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, तात्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा

उदयनगर, (प्रतिनिधी) : माघील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे करवंड गावा जवळील लेंडी धरणपूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र दुसरीकडे धरणाच्या पाण्यामुळे श्रीकृष्णनगरला जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.मागील वर्षापासून हा पूल वाहून गेला आहे.
करवंडपासून जवळच असलेल्या श्रीकृष्णनगर येथे जाण्यासाठी असलेला हा पूल पावसाचे पाणी आल्याबरोबर वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊ शकते. अजून जोरदार पाऊस झाला तर पूर्ण रस्ता वाहून जाऊ शकतो
विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
या पुलावरून परिसरातील शाळकरी विद्यार्थी दररोज ये-जा करतात. पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “पूल आधीच जीर्ण होता. प्रशासनाने वेळीच दुरुस्ती केली असती तर ही वेळ आली नसती.”
आणखी पाऊस झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशातच जर पावसाचा जोर वाढला तर उर्वरित पूल आणि रस्ताही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावकऱ्यांची मागणी आहे की संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन रखडलेला पूल दुरुस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी . अशी मागणी होत आहे.

Đọc xong thấy rất bổ ích. Letco chuyên du học Hàn Quốc, tư vấn 1-1 theo năng lực và ngân sách từng bạn. Ghé thăm letco.vn để được hỗ trợ.
[168749]supplies professional anti-violence equipments and solutions for the whole world with strong and perfect production capacity. anti-violence.org