mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Migrant worker commits suicide by hanging at Hotel Oasis in Khamgaon :खामगावच्या हॉटेल ओएसिसमध्ये परप्रांतीय कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या 

खामगाव (प्रतिनिधी) : दि. 14 सप्टेंबर : चिखली बायपासवरील प्रसिद्ध हॉटेल ओएसिस बार अँड रेस्टॉरंट येथे एका परप्रांतीय कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

मृतकाचे नाव अजित सरोज मंडल, वय 45 वर्षे, रा. मालदा, पश्चिम बंगाल असे आहे. तो याच हॉटेलमध्ये कामाला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

ही घटना आज दिनांक 14.09.2026 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.ही घटना खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

या प्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र आहेरकर यांच्याशी संपर्क साधला असता, “घटनेची माहिती   अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही,असे त्यांनी सांगितले.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिस त्याठिकाणी उपस्थित होते. 

दरम्यान, या घटनेमुळे चिखली बायपास परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top