mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Stopping the business of buying and selling votes: मतदान खरेदी – विक्रीचा व्यापार थांबविणे हीच डॉ .बाबासाहेबांना खरी आदरांजली – प्राचार्य वसंतराव गाडेकर

जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे येथे महापरिनिर्वाण दिनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेबांचे मौलीक विचार आत्मसात करावे. आणि भारतीय संविधानाचा जीवनभर आदर बाळगून आपल्याला मिळालेल्या घटनादत्त मतदानरूपी अधिकाराचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर करून देशाचा सुजान नागरीक बनावे

 

चिखली – मंगरूळ नवघरे  स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव गाडेकर यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेबांचे मौलीक विचार आत्मसात करावे आणि भारतीय संविधानाचा जीवनभर आदर बाळगून आपल्याला मिळालेल्या घटनादत्त मतदानरूपी अधिकाराचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर करून देशाचा सुजान नागरीक बनावे आणि निवडणूकीमध्ये चाललेला मतदान खरेदी – विक्रीचा व्यापार थांबविण्यासाठी नागरीकांनी पुढे होऊन लोकशाहीचे संरक्षण करावे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले .
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक डी . एस . वायाळ , अविनाश घुगे, गजानन गोसावी यांचेसह शाळेतील विद्यार्थ्यांनी आदरांजली गीत गायन व मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांना अभिवादन केले .
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वर्ग १० मधील विद्यार्थिनी कु . शुभांगी जाधव , कु .भारती आंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन कु . मयुरी अंभोरे यांनी केले .

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top