mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Anuradha Engineering students’ Garuda leap..59 students achieve remarkable performance in NPTEL exam   अनुराधा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांर्ची गरूड झेप..

NPTEL परीक्षेत 59 विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

आज दि. 10 डिसेंबर 2025 अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने पुन्हा एकदा तांत्रिक शिक्षण क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत NPTEL या भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित ऑनलाइन परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले आहे. एकूण 176 पैकी तब्बल 59 विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाने इतिहास रचला आहे.

चिखली(प्रतिनिधी ) आज दि. 10 डिसेंबर 2025 : अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने पुन्हा एकदा तांत्रिक शिक्षण क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत NPTEL या भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित ऑनलाइन परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले आहे. एकूण 176 पैकी तब्बल 59 विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाने इतिहास रचला आहे.

 NPTEL – National Programme on Technology Enhanced Learning हा भारत सरकारद्वारे राबवला जाणारा राष्ट्रीय तांत्रिक शिक्षणवर्धनाचा उपक्रम आहे. या उपक्रमाची स्थापना सन 2003 मध्ये झाली असून यामागे सात IITs आणि IISc बंगळुरू यांचा संयुक्त सहभाग आहे.

या माध्यमातून विद्यार्थ्यांना ४, ८ आणि १२ आठवड्यांचे अत्याधुनिक ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. कोर्सेसमध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, AI, मशीन लर्निंग, व्यवस्थापन, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रमांचा समावेश असतो.

IIT प्राध्यापक स्वतः या कोर्सेसची व्हिडिओ लेक्चर्स तयार करतात. आठवड्याला असाइनमेंट देण्यात येतात व कोर्स संपल्यानंतर राष्ट्रीय पातळीची परीक्षा घेतली जाते. परीक्षा प्रॉक्टर्ड सेंटरवर होत असून 60 पेक्षा जास्त गुण मिळवणे कठीण समजले जाते.

परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना IIT कडून प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र उद्योगक्षेत्रात अत्यंत मान्यताप्राप्त असून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मोठे पाऊल ठरते.

NPTEL परीक्षेतील शाखानिहाय उत्कृष्ट कामगिरी पुढीलप्रमाणे अभियांत्रिकी : 51 पैकी 22, माहिती तंत्रज्ञान : 102 पैकी 33, इलेक्ट्रॉनिक्स : 2 पैकी 1, मेकॅनिकल : 21 पैकी 3 ई. उत्तीर्ण झाले आहेत. सदर  आकड्यांवरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि महाविद्यालयाचा अभ्यासक्रमातील दर्जा स्पष्ट दिसून येतो. NPTEL परीक्षेत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणे अत्यंत कठीण मानले जाते; परंतु अनुराधाच्या विद्यार्थ्यांनी ही कठीण सीमा सहज ओलांडली आहे.

राहुल बोंद्रे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून म्हणाले की, ही कामगिरी म्हणजे चिखलीचा अभिमान असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून राष्ट्रीय स्तरावर जे यश मिळवले, ते त्यांच्या कष्टांचे फलित आहे. पुढील काळातही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू असे म्हणाले.परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ.  राहुलभाऊ बोंद्रे

NPTEL ही विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी तंत्रज्ञानातील आघाडीच्या संकल्पनांची खरी कसोटी आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण महाविद्यालयाच्या नियोजन, प्रशिक्षण आणि परिश्रमाचे प्रतिक आहे .(प्राचार्य डॉ. अरुण नन्हई)

अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने मिळवलेले हे यश केवळ राष्ट्रीय प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून, त्यातून महाविद्यालयातील अध्यापन पद्धती, तांत्रिक साधनसामग्री आणि प्राध्यापकवर्गाची गुणवत्ता अधोरेखित होते.

आजचे हे यश म्हणजे महाविद्यालयाच्या तांत्रिक प्रगतीचा नवा शिखरबिंदू, आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व आहे.

यावेळेस परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ व्ही आर यादव, सचिव अँड सौ वृषालीताई बोंद्रे , कोषाध्यक्ष  श्री सिद्धेश्वर वानेरे , विश्वस्त श्री आत्माराम देशमाने , श्री वर्धमान डहाळे , श्री अतरोद्दिन काझी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी डाॅ. राजेंद्र कोकाटे, डाॅ. राजेश मापारी, संगणक विभाग प्रमुख डाॅ. पि. एस. गावंडे, प्रा. एम. ए. पाटील आदी प्राध्यापकांनी मेहनत घेतली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top