
बुलडाणा-(प्रतिनिधी) स्थानिक मुकुल वासनिक विधी महाविद्यालय, बुलडाणा येथे आज दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशावरुन व लिगल सव्हीसेस अथोरिटी अॅक्ट (लिगल सव्हीसेस क्लिनीक्स) नियम, २०११ मधील नियमानुसार विदर्भ युवक विकास संस्था, बुलडाणा व्दारा संचालीत मुकुल वासनिक विधी महाविद्यालय, बुलडाणा संस्था नोंदणी क्रं. एफ-७९२ मध्ये जनसामान्यांच्या सोई करीता लिगल एड क्लिनीकचे उदघाटन दिवाणी न्यायाधीश वरिष्टस्तर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जनसामान्याकरीता हक्काचे व्यासपीठ म्हणुन हे क्लिनीक कायदेशीर सेवा देण्यास सदैव तत्पर राहिल अशी आशा जिल्हा प्राधिकरण सेवेचे नितीन पाटील यांनी व्यक्त केली.
पिडित गोर गरीब जनतेसाठी हे क्लिनीक निश्चितच उपयोगी ठरेल .– महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिल्पा ठाकरे
लिगल एड क्लिनीकची स्थापना प्रत्येक विधी महाविद्यालयात करणे गरजेचे आहे.ॲड. संतोष वानखेडे-
यावेळी ॲड.सुबोध तायडे, अॅड वैभव पारघे, जेष्ठ समाजसेविका संगीता पवार, आर. आर. इंगळे, नितीन लांडे, विक्की नाईकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.जनसामान्याच्या सोईकरीता लिगल एड क्लिनीक दि.१५/१२/२०२५ पासुन सर्व सामान्याकरीता खुले करण्यात आले आहे. पिडित व शोषित जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रविण नवघरे, अमोल लहाने, शिवचरण टिकार, विजयसिंग हाडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया पाटील तर आभार प्रदर्शन शैलेश खेडकर यांनी केले.


