मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गारोळे विजयी झाले आहेत. नगरपरिषदेतील एकूण २६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ९ आणि शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.

बुलढाणा, दि.21 : मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे किशोर भास्कर गारोळे विजयी झाले आहेत. नगरपरिषदेतील एकूण २६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ९ आणि शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किशोर भास्कर गारोळे यांनी १०,२३९ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभागानिहाय निकालात प्रभाग १ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.)च्या सतीष गोपाळ ताजने ६६० मते मिळवत विजयी ठरले, तर प्रभाग १ ब मधून रुपाली किशोर गारोळे ७१८ मते मिळवून विजयी झाली. प्रभाग २ अ मधून डॉ. दिपीका रविराज रहाटे (शिवसेना) ८९२ मते, आणि २ ब मधून शिवसेना(उ.बा.ठा.) च्या महेश शेषराव रिंढे १,००६ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ३ अ मधून काँग्रेसच्या मंगला सुरेश मानवतकर ९६३ मते, आणि ३ ब मधून मुजीब हसन अ. हबीब कुरेशी यांनी ८५० मते मिळवून विजय मिळवला. प्रभाग ४ अ मधून काँग्रेसच्या जमनबाई पीरु गवळी १३५९ मते, ४ ब मधून काँग्रेसच्या मुजिब खॉ वली महमद खाँ १५३९ मते मिळवत यश संपादन केले. प्रभाग ५ अ मधून काँग्रेसच्या अंजुम बानो शेख अख्तर कुरेशी १,१७७ मते, आणि ५ ब मधून काँग्रेसच्या शेख महेबुब शेख जुम्मा गवळी हे १,१८७ मते मिळवून विजयी झाले.
प्रभाग ६ अ मधून शिवसेनेच्या नर्मदा सुरेश गायकवाड १,०७७ मते, ६ ब मधून ओमप्रकाश पांडूरंग सौभागे १,१६२ मते मिळवत विजयी ठरले. प्रभाग ७ अ मधून काँग्रेसच्या शबनूर बी शेख रईस कुरेशी १,५०६ मते, आणि ७ ब मधून मोहम्मद अलीम ताहेर यांनी १,८२४ मते मिळवून सदस्यपद पटकावले.
प्रभाग ८ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.) च्या नितीन रमेश तुपे यांनी ९५८ मते, ८ ब मधून शिवसेनेच्या सरला मोहन जाधव १,०१७ मते मिळवून विजयी ठरल्या. प्रभाग ९ अ मधून काँग्रेसच्या सुनिता संजय ढाकरके ८०९ मते, ९ ब मधून वैभव गिरीश उमाळकर १,००० मते मिळवत यश संपादन केले. प्रभाग १० अ मधून शिवसेनेच्या अक्का बद्रीनाथ गायकवाड ९९३ मते, १० ब मधून कविता विशाल काबरा ७३० मते मिळवत विजयी ठरली. प्रभाग ११ अ मधून शिवसेना (उ.बा.ठा.) च्या विलास वैजीनाथ चनखोरे १,९८९ मते तर ११ ब मधून आफिया निसार अन्सारी या १,९०५ मते मिळवून विजयी ठरली.
प्रभाग १२ अ मधून शिवसेनेचे सुरेश विश्वनाथ वाळुकर ८५८ मते, १२ ब मधून शिवसेनेच्या प्रिती प्रविण शिंगनाथ ६७६ मते मिळवत विजयी ठरले. प्रभाग १३ अ मधून शिवसेनेच्या रुपाली मनोज जाधव यांनी ७३२ मते तर १३ ब मधून काँग्रेसच्या निलीमा शरद सोमन या ६१० मते मिळवून विजयी झाल्या.


