mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Late Rajendraji Srivastava M.S.W College students visit Navachaitanya Addiction De-Addiction Center: स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव M.S.W महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची  नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रास भेट 

तालुक्यातील पारध येथील स्व.राजेंद्र श्रीवास्तव समाजकार्य ( M.S.W ) महाविद्यालयाच्या M.S.W भाग-I च्या विद्यार्थी दि.19/12/2025 शुक्रवार रोजी प्राचार्य आर.ए.कदम  प्रा.एस.एम.लक्कस यांच्या मार्गदर्शनाखाली   कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार क्षेत्रकार्य अध्ययन उपक्रमातंर्गत शेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रास भेट दिली

भोकरदन ( प्रतिनिधी ) –  तालुक्यातील पारध येथील स्व.राजेंद्र श्रीवास्तव समाजकार्य ( M.S.W ) महाविद्यालयाच्या M.S.W भाग-I च्या विद्यार्थी दि.19/12/2025 शुक्रवार रोजी प्राचार्य आर.ए.कदम  प्रा.एस.एम.लक्कस यांच्या मार्गदर्शनाखाली   कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार क्षेत्रकार्य अध्ययन उपक्रमातंर्गत शेलूद येथील नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रास भेट दिली .  प्राचार्य कदम यांनी प्रास्ताविक करून नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुदकर यांनी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम , केंद्राचे ध्येय धोरण  दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा  याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी एकाच छताखाली तात्पुरता निवारा , वैद्यकीय सेवा , कायदेशीर समुपदेशन , तात्काळ सेवा, दुरचित्रवाणी संमलेन इत्यादी विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली  देऊन  व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन  केले . तसेच दुसरी भेट विद्यार्थ्यांनी सखीवन स्टॉप सेंटर बुलढाणा येथे दिली . यामध्ये ॲड .अंजना घोंगडे यांनी संकटग्रस्त महिलांना मोफत 24 तास सेवा , तात्काळ मदत , कौटुंबिक हिंसाचारापासून  महिलांचे सरंक्षण कायदा , महिलावरती  होणारे अत्याचार,फसवणूक व परिस्थिती अनुरूप अत्याचाराला बळी पडलेल्या संकटग्रस्त महिलांना मदत व उपचार कसे मिळवून दिले जाते . याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  छत्रपतीसंभाजीनगर येथील  सखी  वनस्टॉप सेंटरच्या आश्विनी घुगे यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा , पोश कायदा ,गुड टच,बॅड टच तसेच संकटग्रस्त महिला व मुलींसोबत येनारे अनुभव कथन केले. या भेटी दरम्यान आभार प्रदर्शन आश्विनी अंभोरे या विद्यार्थिनीने केले . स्व.हरिवंशराय बच्चन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत संचालित स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव समाजकार्य महाविद्यालयात पारध येथे M.S.W या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन व अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी शासकीय पद्धतीने समुपदेशन करण्याचे आव्हान संस्थेचे सचिव श्री.विक्रांत राजेंद्र श्रीवास्तव यांनी केले . 

यावेळी  नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर माउली महाराज शेलुदकर,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मनीष भैय्या श्रीवास्तव तसेच  सर्व पत्रकार बांधव  आणि  M.S.W भाग-I चे विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रम पूर्णत्वास जाण्यासाठी नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी,महाविद्यालयाचे कर्मचारी व  विद्यार्थ्यांनी  यांनी परिश्रम घेतले .

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top