अजिंठा रोडवरील व्हाईट रोज रिसॉर्ट येथे ऑल इंडिया पोस्टल एस.सी/,एस टी एम्प्लॉईज फेडरेशन असोसिएशन शाखा बुलढाणा यांच्या वतीने दुसरे द्विवार्षिक अधिवेशन २०२५ बुलढाणा येथे दि.25.12.2025 रोजी पार पडले

बुलढाणा (प्रतिनिधी)- अजिंठा रोडवरील व्हाईट रोज रिसॉर्ट येथे ऑल इंडिया पोस्टल एस.सी/,एस टी एम्प्लॉईज फेडरेशन असोसिएशन शाखा बुलढाणा यांच्या वतीने दुसरे द्विवार्षिक अधिवेशन २०२५ बुलढाणा येथे दि.25.12.2025 रोजी पार पडले .या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात तर प्रमुख उपस्थित म्हणून जयराम जाधव (सर्कल सचिव महाराष्ट्र आणि गोवा राज्य),गणेश. बी. अंभोरे (डाक अधीक्षक बुलढाणा विभाग) हे होते. सन्माननीय उपस्थिती म्हणून रविंद्र तिरपुडे (जनरल सेक्रेटरी, वेस्टर्न झोन) मा.सतिष पवार (संपादक मुकनायक वार्ता बुलढाणा) पि.टी.आसलकर (सेवा निवृत्त अधिक्षक), सतिष निकम ( सहाय्यक अधिक्षक, बुलढाणा उपविभाग),गौतम मेश्राम ( रिजनल सेक्रेटरी, नागपुर),मा.सुरेश जाधव (मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ), संजय जाधव ( पत्रकार, साम टि. व्हि) गजानन काळे,( डाक निरीक्षक मेहकर उपविभाग) मनोज दलाल ( डाक निरीक्षक,मलकापूर उपविभाग),विजय धंदर साहेब डाक निरीक्षक, नागपूर विभाग
(कैलास तायडे सहाय्यक अधिक्षक, बुलढाणा विभाग),निळकंठ बावस्कर (सहाय्यक अधिक्षक, खामगांव उपविभाग) प्रफुल्ल शेगावकर ( तक्रार निरीक्षक, बुलढाणा विभाग) हे होते.
बुद्ध ,फुले, शाहू ,आंबेडकरांची विचारधारा आणि बाबासाहेबांचा आदेश आहे की समाजात जाऊन काम करा न्याय मिळून द्या.
मा.सतीश पवार (मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मूकनायक वार्ताचे संपादक)
असोसिएशनची स्थापना 1982 साली दिल्ली येथे झाली असून टपाल खात्यामध्ये तीन संघटना मागासवर्गीयांच्या हितासाठी काम करत आहे. प्रशासनासाठी निगडित असल्यामुळे विरोधात नव्हे तर न्यायाची भूमिका महत्त्वाची मा.जयराम जाधव (सर्कल सचिव , महाराष्ट्र आणि गोवा राज्य)
यावेळी विविध मान्यवरांची देखील भाषणे झाली. या अधिवेशनाचे आयोजक रवींद्र झिने,आशिष,इंगळे,अमोल दोतोंडे ,विनायक हिवराळे ,हे होते या अधिवेशनाचे संचलन प्रल्हाद कचरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रांजली इंगळे यांनी केले


