mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

State level award ceremony held at Sakharkherda: साखरखेर्डा येथे रंगला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ।

पुरस्कार नवीन काम करण्याची ऊर्जा देते – रविकांत तुपकर

पुरस्कार कार्याचे फलित – एच.डी.ओ. प्रा. खडसे

बुलढाणा- (प्रतिनिधी) – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दैनिक भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘ व समाज भूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बहुप्रतिक्षित असलेला राज्यस्तरीय पुरस्कार  दि.30 डिसेंबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलच्या भव्य प्रारंगणामध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत  तुपकर ‘ शिवसेनेचे युवा नेते योगेश जाधव , उपविभागीय अधिकारी संजय खडसे ‘ साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड , लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते ‘ भीमशक्ती संघटनेचे राज्याचे नेते भाई कैलास सुखधाने, साखरखेर्डा येथील ‘ग्रामविकास अधिकारी अविनाश नागरे ‘ पंजाबराव हाडे,आर.टी.ओ. प्रियंका  काळे साखरखेर्डा ग्रामसेवक सोसायटीचे अध्यक्ष ललित शेठ अग्रवाल ‘रिपाईचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाई खरात ‘ आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे ‘ ज्येष्ठ साहित्यिक किसन पिसे ‘ माजी सरपंच तोताराम ठोसरे ‘ ज्येष्ठ पत्रकार दिलीप नाईकवाड , पारस मनारखेड चे तंटामुक्तीचे अध्यक्ष मुकेश सुरुशे,सरपंच पती अमित जाधव ,पिपळगावचे सरपंच नितीन ठोसरे ‘ साखरखेर्डाचे माजी उपसरपंच सय्यद रफिक .माजी पंचायत समिती सदस्य रफिक प्यारे ‘ ग्राप सदस्य इब्राहिम शहा ‘ शिंदी चे माजी सरपंच विनोद खरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष खरात, अरुण देशमुख , मा .काँग्रेसचे शिवदास रिंढे उपसभापती पंचायत समिती सुनील भाऊ जगताप , गंभीरराव खरात ‘भिम शक्तीच्या महिला जिल्हाध्यक्ष आरती  इंगळे , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया मनवर ‘  निमंत्रक दिलीपराव खंडारे , उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अस्तित्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन काटे तर स्वागत अध्यक्ष ‘  माजी प्राचार्य संतोष दसरे व माजी मुख्याध्यापक रमेश ठोसरे होते .

 सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करून कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष ठोसरे सर ,दसरे सर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर समाज भूषण अर्जुन गवई यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला ‘कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी पुरस्काराची संकल्पना विशद केली .त्यानंतर अर्जुन गवई यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 

उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले .भाई कैलास सुखधाने ,लोक जागरचे प्रवीण  गीते , यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले ‘

रविकांत तुपकर यांनी चौफेर फडकेबाजी केली ‘ पुरस्कार हा येणाऱ्या कामासाठी प्रेरणा देत असतो ‘ असे सांगून त्यांनी बरेच किस्से सांगितलं ‘

या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुरस्कारार्थी आले होते . जालना चंद्रपूर सोलापूर .भंडारा ‘ नंदुरबार जळगाव ‘ जालना ‘ खामगाव मेहकर ‘छत्रपती संभाजीनगर ,येथून सुद्धा अनेक जण पुरस्कार घेण्याकरता आले होते ,यामध्ये 55 विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला ‘

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ‘ निवड समितीचे विकास सुखदाने ‘ विशाल सुखदाने ‘ समाधान सरकटे . राधेश्याम काळे ‘ कैलास देशमुख , अमोल गवई आकाश गवई ‘ शरद सरकटे ‘ मंगेश सरकटे सतीश काळुसे ,शाळेचे प्राचार्य जाधव सर देवानंद सरकटे दादाराव सरकटे , पिंटू जाधव . यांनी परिश्रम घेतले .

पुरस्कार सोहळ्याला हजारो नागरिकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली तायडे व स्नेहल सरकटे यांनी केले.तर आभार प्रदर्शन निमंत्रक दिलीपराव खंडारे यांनी केले .कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांची भोजनाची व्यवस्था समाजभूषण अर्जुनराव गवई यांनी केली ‘

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top