mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

World-renowned Venerable Ajahn Jayasaro and Sangha hold program at TUDONG Dhammasara Shanti Bhoomi Takali: जगविख्यात पूज्य भन्ते अजाण जयसारो व संघ यांचा TUDONG धम्मसारा शांती भूमी टाकळी येथे कार्यक्रम संपन्न

मोताळा – (प्रतिनिधी) दि. 27 डिसेंबर रोजी धम्मसारा शांती भूमी टाकळी येथे पूज्य भन्ते अजाण जयसारो (थायलंड) व भिक्खू संघानी 28 डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा ,तरोडा, कोथळी, वारुळी, पिंपरी गवळी आणि शेलापुर या गावांना भेटी दिल्या . पूज्य भन्ते अजण जायसारो व त्यांचा भिक्खू संघ पायी प्रवास करीत संघ दर्शन व प्रवचनाचा लाभ घेण्याची संधी धम्मसारा शांती भूमी टाकळी यांच्या माध्यमातून मिळाली.
यावेळी TUDONG दरम्यान बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
आज दि.1 जानेवारी रोजी धम्मसारा शांती भूमी टाकळी येथे प्रथम भोजनदान केल्यानंतर पूज्य भन्ते अजाण जयसारो यांनी त्रिशरण पंचशील, धम्मदेशना दिली. भारत हा देश बुद्धांची जन्मभूमी आहे.देशातील लोक अतिशय शांत ,दयाळू आणि प्रेमळ आहेत हे मला आजच्या पन्नास वर्षा अगोदर अनुभवायला मिळाले. मी भारतामध्ये आलो होतो. आणि आजही त्याचा मला प्रत्यय TODONG दरम्यान येत आहे.
शिल, समाधी आणी भावना या विषयावर प्रवचन देऊन आपल्या जीवनात जी सत्कर्मी करीत आहोत ती बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराची कार्य करीत आहोत असे त्यांनी सांगितले. समारोपीय कार्यक्रमात धम्म सारा शांती भूमी टाकळी या परिसराला सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या शेतकऱयांचे, सरपंच यांचे स्वागत करण्यात आले. तसेच लाईटची कायमस्वरूपी व्यवस्था करणारे संतोष वैराळकर (ठेकेदार विद्युत विभाग ) यांना पू. भन्ते अजान जयसारो यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली .
TUDONG दरम्यान कार्यक्रम आयोजित करणाऱ्या गावातील विजय दोडे , सोपान सावळे, लाला गवई ,दिलीप वाकोडे अनिल खराटे कैलास खराटे सुनिल सुरडकर पवन गायकवाड रघुनाथ वाकोडे नाना दाभाडे यांनी उपस्थित समाज बांधवांकडून पु.भन्ते अजाण जयसारो यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.उपस्थितांना पूज्य भन्ते अजाण जयसारो यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आला त्या वेळी मोताळा तालुक्यातील धम्म बांधव उपस्थित होते. मंगलमय वातावरणात TUDONG कार्यक्रम संपन्न झाला.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top