
बुलढाणा (प्रतिनिधी ) दि.०३ जानेवारी रिक्रेशन क्लब व बुलढाणा मुख्य डाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुलढाणा मुख्य डाकघर येथे थोर समाजसुधारिका व स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास बुलढाणा मुख्य डाकघरचे सर्व कर्मचारी तसेच महिला प्रधान अभिकार्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेखा कोकाटे (डाक सहाय्यक) यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.थोर महामानवांच्या विचारांना उजाळा देत कार्यक्रम शांततेत व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शेवटी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Please follow and like us:


