mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Bear attacks farmer, farmer seriously injured in attack  :  शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला ,हल्यात शेतकरी गंभीर जखमी

चिखली (प्रतिनिधी ): तालुक्यातील धोडप येथील अल्पभूधारक शेतकरी उत्तम बळीराम परिहार- हे शेतामधे गेले असता अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.ही घटना ६ जानेवारी मंगळवार रोजी दु.००. १  वा.च्या सुमारास घड़ली.

उत्तम परिहार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी शेतात हरभरा ,गहू, तूर पेरणी केली असल्यामुळे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.जंगली प्राण्यांच्या हैदोसामुळे पीकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना दररोज सकाळी शेतात जावे लागायचे अशातच दि ६ जानेवारी मंगळवार रोजी सकाळ पासून ते शेतात गेले असता अचानक त्यांच्यावर अस्वलाने दु.००.१ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला केला .उत्तम परिहार यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची माहिती मिळताच धोडप येथील सरपंच प्रदीप दामोधर कोल्हे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन उत्तम परिहार यांना रुग्णवाहिका यांना फोन करून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे त्यांना दाखल करण्यात आले. या परिसरात जगली प्राण्याचा जास्त प्रमाणात वावर आहे. काही दिवसापूर्वी करवंड येथील शेतकऱ्यावर असाच हल्ला अस्वलाने केला होता.
अशा घटना घडू नयेत यासाठी वन विभाग प्रशासनाने जंगली प्राणी यांचा क़ायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी करवंड ,धोडप, पळसखेड सपकाळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top