mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Free health check-up camp held at Takarkhed M.D: टाकरखेड मु. येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न,

अमडापूर :(प्रतिनिधी)  येथून जवळच आलेल्या   चिखली अमडापूर मार्गावर ग्राम टाकरखेड (मु) हे गाव आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे. गावच्या सरपच सौ .लताताई डहाके व ग्राम सचिव माने मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने  शासनाच्या येणाऱ्या सर्व योजना गावकऱ्यांसाठी राबविण्यात येतात.याच उद्देशाने नुकतेच टाकरखेड (मु) येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत व ॲनिमिया मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत टाकरखेड (मु) व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावात मोफत ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी शिबिराचे दि. 8 जानेवारी रोजी टाकरखेड (मु.) येथे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. लता ज्ञानेश्वर डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला उपसरपंच श्री. तेजराव गायकवाड, ग्रा. पं.अधिकारी सुरेखा माने, ग्रा. पं सदस्य ज्ञानेश्वर डहाके, प्रलय खरात, सुनील खेन्ते, पोलिस पाटील वाघ यांची उपस्थितीत होती.या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉ मंगेश मुंढे ( समुदाय आरोग्य अधिकारी,सौ नंदा हाडे ( आरोग्यसेविका),श्री अनुप भालेराव ( आरोग्यसेवक),श्री सोहेल शेख ( प्रयोग शाळा तंत्रज्ञ)यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, किशोरवयीन मुली, गर्भवती व स्तनदा माता व ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ॲनिमिया आढळलेल्या लाभार्थ्यांना लोह व फोलिक ॲसिडच्या गोळ्या देऊन संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांमुळे गाव निरोगी व सक्षम बनत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top