
बुलडाणा (प्रतिनिधी):विदर्भ युवक विकास संस्था अंतर्गत मुकुल वासनिक विधी महाविद्यालय, बुलडाणा येथे दि.१२ जानेवारी, २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वि.यु.वि. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर होते. संस्थेच्या सचिव प्रा. सौ. मिनल आंबेकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. सौ. मिनल आंबेकर यांनी प्रतिकूल परिस्थीतीत शिवाजी महाराजानां कसे घडविले याविषयी भाष्य केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संतोष आंबेकर यांनी जिजाऊनी तरुणांना दाखविलेले स्वराज्याचे स्वप्न व ते स्वप्न साकार करतांना तरुणांना ऊर्जा देणारे स्वामी विवेकानंदांचे विचार यावर प्रकाश टाकला. महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाच्या छात्र अध्यापिका प्रणाली खराटे यांनी जिजाऊ वंदना गायली. यावेळी विधी महाविद्यालय व महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्याथीनी कु. अंजली काळे, सोनिया मुंढे, हेमांगी टेभीकर, वैभव माने, यास्मीन श्रीवास्तव यांनी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आपापले आपले विचार व्यक्त केले. तसेच या युवा दिनाचे औचित्य साधुन दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारीत सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कुःपुजा शिगणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वृषाली काकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्र. प्राचार्या सुरेखा इंगळे, प्रा.प्रिया पाटील, प्रा. अनुराधा जाधव, प्रविण नवघरे, शिवचरण टिकार, अमोल लहाने, शैलेश खेडकर, चेतन उबरहंडे, विजयसिंग हाडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


