mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Model Degree College conducts “On the way to the exam” guidance program : मॉडेल डिग्री कॉलेजच्या वतीने “परीक्षेला जाता जाता” मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

बुलडाणा (प्रतिनिधी ) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचालित मॉडेल डिग्री कॉलेज, बुलडाणा यांच्या वतीने भारत विद्यालय, बुलडाणा येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “परीक्षेला जाता जाता” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन  दि.17/01/2026 ला करण्यात आले. सदर कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसने हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, आत्मविश्वास वाढवणे व सातत्याने अभ्यास करण्याचे महत्त्व याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास भारत विद्यालयाचे प्राचार्य पी. डी. गायकवाड व प्रा. मतीन शेख उपस्थित होते. तसेच मॉडेल डिग्री कॉलेजचे प्रा. डॉ. शीला रोकडे दाभाडे यांनी प्रश्नपत्रिका कशी वाचावी, मुद्देसूद उत्तरलेखन व वेळेचे योग्य नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रा. दिक्षा जाधव यांनी परीक्षेपूर्व तयारी, उजळणीचे तंत्र व अभ्यासाचे नियोजन यावर मार्गदर्शन केले, तर प्रा. शिल्पा साडतकर यांनी परीक्षेतील मानसिक तणाव कसा कमी करावा व एकाग्रता कशी वाढवावी याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या.

याचप्रमाणे राहुल हिवाळे यांनी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सादरीकरण, स्वच्छ लेखन व परीक्षेदरम्यान घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शकांनी “परीक्षा ही भीती नसून आपले ज्ञान व्यक्त करण्याची संधी आहे” असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सोप्या भाषेत दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व उत्साह निर्माण झाला.

कार्यक्रमास भारत विद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भारत विद्यालयाचे प्रा. मतीन शेख यांनी मॉडेल डिग्री कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन केले, असे मत व्यक्त केले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top