mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Tyagamurthy Ramai Ambedkar’s birth anniversary will be celebrated with a competition:त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जन्मोत्सव निबध स्पर्धेने होणार साजरा

निबंध स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हा! सतीश पवारांचे आव्हान 

बुलढाणा (प्रतिनिधी )

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस  म्हणजे 7 फेफ्रुवारी 1898 . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या साथीला साथ  देऊन पाठीमागे खंबीरपने उभी राहणारी माता रमाई, स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी परिस्थितीशी  भांडत दुःख,त्याग , समजदारपणा, उदंड मानवता म्हणजे रमाई .एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गौऱ्या बनविणे आणि त्या  बाजारामध्ये विकून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लंडनला पैसे पाठवणाऱ्या रमाई बद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यागमूर्ती माता रमाई यांच्याविषयी माहिती घराघरात  पोहोचवण्यासाठी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तथा मूकनायक फाउंडेशनचे संस्थापक  अध्यक्ष  सतीशदादा पवार यांनी माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.बुलढाणा शहरात प्रथमच रमाई जन्मोत्सवानिमित्त नऊ कोटीची माता “आई रमाई”  या विषयावर निबंध असेल त्यात  प्रथम बक्षिस ५०००/– द्वितीय बक्षिस ३०००/तृतीय बक्षिस २०००/–रुपये असणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी  खालील नंबर वर संपर्क  करण्याचे आव्हान सतीशदादा पवार  यांनी केले आहे.

संपर्क :–7720999345/ 86055 73235/ 9850413251

टिप:–सदर स्पर्धा ही सर्व वयोगटातील महिलांसाठी आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपले नाव व मोबाईल क्रमांक वरील व्हाट्सअप नंबर वर पाठवावेत किंवा खालील कमेंट बॉक्समध्ये पाठवावेत. स्थळ वेळ आणि दिनांक लवकरच कळविण्यात येईल. सर्वांना प्रवेश मोफत आहे. स्पर्धकांनी केवळ लेखनाचे साहित्य म्हणजेच पेपर पेन पेन्सिल इत्यादी सोबत आणावीत. आयोजक – मूकनायक फाउंडेशन

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top