
मोताळा (प्रतिनिधी):
पंचायत समिती यांच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा क्र.2 (PMAY-G) २०२४-२५ टप्प्यातील उदिष्ट घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्र (रुफटॉप सोलर) बसवल्यास केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत भरघोस अनुदान मिळणार असल्याचे गट विकास अधिकारी अशोक काळे यांनी सांगितले की, लाभार्थ्यांनी घरावर १ किलोवॅट क्षमतेचे सौर संयंत्र बसवल्यास ३० हजार रुपये, २ किलोवॅटचे बसवल्यास ६० हजार रुपये तर ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेचे संयंत्र बसवल्यास ७८ हजार रुपये अनुदान थेट डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ च्या लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त १५ हजार रुपयांचा लाभही उपलब्ध असल्याचे गट विकास अधिकारी अशोक काळे सागितले आहे.
या दुहेरी योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील कुटुंबे वीज बिलापासून मुक्त होऊ शकतील. स्वच्छ ऊर्जेचा वापर करून पर्यावरण संरक्षणातही योगदान देऊ शकतील.
असे आव्हान गट विकास अधिकारी अशोक काळे यांनी तालुक्यातील लाभार्थ्यांना केले आहे .ही योजना ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच देशाच्या हरित ऊर्जा धोरणालाही बळ देणारी ठरणार आहे.


