mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

A case has been registered against a teacher for brutally beating a student at a Zilla Parishad school in Pimpalgaonraja: पिंपळगांवराजा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाणप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल 

खामगांव/ प्रतिनिधी

खामगाव  तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणित चुकले या रागातून शिक्षकाने अवघ्या १० वर्षाच्या  इयत्ता चौथीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  राज्य शासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियम, मार्गदर्शक सूचना आणि जबाबदार्‍या ठरवून दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या कागदावरच  आहे का?  असा प्रश्न या घटनेच्या अनुषंगाने पालकवर्गातून  उपस्थित होत आहे. पवन इंगळे (वय १० वर्ष) असे या चिमुकल्या विद्यार्थ्याचे नाव असून वर्गशिक्षक रवींद्र चीम यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण इतकी क्रूर होती की पवन इंगळे या विद्यार्थ्याला थेट खामगाव येथील सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. १३ डिसेंबर रोजीच राज्य शासनाने विद्यार्थी सुरक्षेबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्या सूचनांची पायमल्ली करत शिक्षकाकडून थेट पवनला एवढी बेदम मारहाण झाली तरी ना सदर शिक्षकाविरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नाही हे प्रशासनाचं अपयशच म्हणावं लागेल अशा प्रतिक्रियाही सुज्ञ पालकांतून व्यक्त होत आहेत. 

पिंपळगाव राजा पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी विद्यार्थ्याला रुग्णालयात पाठवले आहे. वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की, लहान मुलाला मारहाण बेदम मारहाण करण्याची मजल शिक्षकाची कशी झाली? या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.संबंधित शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी  आता जोर धरत आहे. आता पोलीस आणि शिक्षण विभाग खरोखर कारवाई करतात का. बघ्याची भूमिका घेतात हे पाहणं महत्वाच आहे.

दरम्यान सदर घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता पोलीस सुत्राकडून माहिती प्राप्त झाली की, पवन नारायण इंगळे वय १० वर्ष हा जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पिंपळगाव राजा येथे इयत्ता चौथा वर्गात शिकत असुन वर नमुद घटना व तारीख वेळी तसेच उक्त  आरोपी शिक्षक याने फिर्यादीचे मुलास प्रश्नाचे उत्तर न आल्याचे कारणावरुन लोखडी स्केलने पाठीवर, मांडीवर व हातावर मारून जखमी केले वरून फिर्यादी हे आज रोजी पोलीस स्टेशनला येवून तोंडी रिपोर्ट दिल्याने व मेडीकल सर्टीफिकेट वरन अप सदरचा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास  बिट पोहेका धीरज देशमुख यांचेकडे  देण्यात आला आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top