mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Vaibhav Kare and Ganesh Chavan climbed the tower at Mohana B. Protest demanding an inquiry into corruption in the Gram Panchayat: मोहना बु. येथील वैभव करे व गणेश चव्हाण चढले टॉवरवर

ग्रामपंचायत मधील भ्रष्टाराच्या चौकशी मागणी करीता आंदोलन

बुलडाणा/ प्रतिनिधी

भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना बु. येथील  वैभव सुरेश करे आणि गणेश हिरामण चव्हाण यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय स्थित ३०० फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन केले. ग्रामपंचायत मोहणा बु. (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार, शासकीय अभिलेखांतील गुन्हेगारी स्वरूपाची खोडतोड, बोगस व नियमबाह्य घरकुल प्रकरणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे आदींबाबत चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच संबंधित दोषींवर जाणीवपूर्वक कारवाई न केल्याबाबत त्यांनी आरोप केला असून  यापूर्वी दिनांक २१/०१/२०२६ पासून बेमुदत उपोषणास बसण्याबाबत त्यांनी लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, सदर निवेदनातील अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व मागण्यांबाबत आजपर्यंत कोणतीही ठोस दखल अथवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. यावरून संबंधित दोषींना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाठीशी घालण्यात येत असल्याचा गंभीर संशय निर्माण झालेला आहे. असा आरोप करीत या सर्व बाबींचा निषेध म्हणून न्यायासाठी दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे / माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या दालनासमोर / किंवा पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते होणार्‍या ध्वजारोहण स्थळी शांततामय व लोकशाही मार्गाने आत्मदहन करणार असल्याची ही पूर्वसचना देत आहे असे त्यांनी निवेदनात नमुद केले आहे. सदर प्रकरणातील सर्व मदद्यांची तात्काळ उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी व माझ्या कुटुंबास न्याय मिळावा, ही मागणी आहे आंदोनलन कर्त्यांनी केली असून आपल्या मागणीसाठी ते टॉवरवर चढले. या आंदोलनाने पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top