
चिखली/प्रतिनिधी
तालुक्यातील सवणा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे उपाध्यक्ष सखाराम दादा करवंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा समितीचे सदस्य दीपक कस्तुरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. सखारामदादा करवंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पराष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . प्रमूख मार्गदर्शक श्री दीपक कस्तुरे यांनी मार्गदर्शनातून महामानवांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तसेच विदयार्थ्याद्वारे शालेय जीवनापासूनच लोकशाही मूल्यांची जपणूक करने हे सूदृढ व बळकट लोकशाहीसाठी कसे आवश्यक आहे. हे बिंबवून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी विचारांची रुजवणुक केली. मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात शिक्षक तथा कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कावयात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. शिस्तबद्ध व देशभक्तीपर सादरीकरणामुळे उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली. प्रभातफेरीदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


