mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Laborer abusing 5-year-old girl

Incident in Hatedi: Accused arrested :मजूराने केला ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार , हतेडी येथील घटना: आरोपी अटक

बुलडाणा/ प्रतिनिधी

एका मजुराने आपल्याच सहकार्‍याच्या ५ वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनविल्याची हादरवणारी घटना हातेडी परिसरात घडली. याप्रकरणातील आरोपी पळून जात असतांना ग्रामिण पोलिसांनी चपळता दाखवित मलकापूर रेल्वे स्टेशनवर त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या परिसरात उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश अशा भागातून आलेले मजूर काम करीत आहेत. यातील बहुतांश मजूर त्याच ठिकाणी खोल्या काढून मुक्कामी आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान संतोष ब्रिजपाल भुझ्या (वय २५) दारू पिवून आला. त्याने एका खोलीत प्रवेश केला. आत ५ वर्षीय बालिका एकटीच होती. तिचे आई-वडील कामावर होते. भुझ्याने कुठलाच विचार न करता या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तो पळून गेला. घरी परतल्यावर ही बाब बालिकेच्या आई-वडीलांच्या लक्षात आली. त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार गजानन कांबळे यांनी तत्काळ आरोपी भुझ्याला पकडण्यासाठी पथक रवाना केले. मलकापूर स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या विरोधात कलम ६५ (२), १३७ (२) बीएनएस सहकलम ४ (२), ५ (एम), ६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय शरद माळी करीत आहेत.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top