मागणीसाठी गजानन ससाने यांचे नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू

बुलडाणा/ प्रतिनिधी
नगर परिषद बुलडाणा नगर परिषद नगराध्यक्ष आसनाच्या शिर्षस्थानावरून काढून टाकलेली संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूर्ववत बसविण्यात यावी या मागणीसाठी बुलडाणा येथील गजानन ससाने यांनी नगर परिषदेसमोर आज २ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण् सुरू केले आहे. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदना नमुद आहे की, २५ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालिन नगराध्यक्ष नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांनी पदभार स्विकारला. सर्वसाक्षीने, संमतीने संविधानाची सतत जाणिव ठेऊल कार्यभार चालावा या शुध्द हेतूने संविधान शिल्पकार यांची भव्य व आकर्षक प्रतिमा नगराध्यक्ष आसनाच्या शिर्षस्थानी स्थापित करण्यात आली होती. काही दिवसानंतर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ती प्रतिमा काढून टाकली तेव्हा सुज्ञ नागरिकांनी नगर परिषद परिसरात ठिय्या आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ती प्रतिमा पुर्ववत स्थापित करण्यात आली होती. परंतु ५ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्विकारला परंतु नगराध्यक्ष यांचे आसनाच्या शिर्षस्थानी असलेली संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पुन्हा काढण्यात येऊन त्या ठिकाणी राजकिय नेत्यांचे फोटो लावण्यात आले. या बाबीचा गजानन ससाने यांनी निषेध केला आहे. तसेच निवदेनात त्यांनी नमुद केले आहे की, भारतीय संविधानाद्वारे भारतीय संविधान अनुछेद २४३-क्यु अन्वये नगर बुलडाणा परिषदेची स्थापना करण्यात आली आणि नागरिकांच्या सेवेसाठी शासन आणि प्रशासनाची नेमणूक करण्यात आली. त्याच व्यक्ती भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान करीत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूर्ववत नगराध्यक्ष आसनाच्या शिर्षस्थानी लावण्यात यावी करीता ससाने यांनी सोमवार २ फेब्रुवारीपासून नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.


