पूज्य भंते विनयपाल महाथेरो, पूज्य भदंत राजज्योती,पूज्य भंते यश महाथेरो यांनी दिली धम्मदेसना

नांदुरा/ प्रतिनिधी
भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा खामगांव व समस्त एकता मित्र मंडळ आणि सुप्रिया महिला मंडळ खोलखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.01/02/2026 पासुन सुर झालेल्या श्रामणेर शिबिराचा समारोप दि.10/02/2026 वार:- मंगळवार ला बौद्ध भिक्खू च्या प्रमुख उपस्थित पार पडला.. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष विनेश इंगळे ता. अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते. तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमांना दिप, धुप व पुष्प अर्पण करण्यात आली. पुज्य भंदत विनयपालजी महाथेरो,पु ज्य भदंत राजज्योती यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशिल दिले. त्यानंतर प्रमुख पदाधिकार्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.
या श्रामनेर शिबिराचे प्रास्ताविक बौद्धाचार्य अनिल नाईक यांनी केले. चार श्रामणेर शिबिरार्थिनी त्यांचे अनुभव कथन केले. कार्यकमाचे अध्यक्ष विनेश इंगळे यांनी शिबिरार्थीना संदेश दिला कि, दहा दिवस शिबीरात आत्मसात केलेले ज्ञान जिवनात आचरण करून, समाजात धम्म प्रचार – प्रसारासाठी कार्य करावे. माता रमाईच्या त्यागातुन मिळालेले हे वैभव विसरू नका असे ते यावेळी म्हणाले.शिबिर प्रमुख रविंद्र दारोकार गुरुजी यांनी शिबिरार्थीना 40 विषय शिकवून त्याचा उपयोग आपण स्वउद्धारा सह समाजाच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन केले. त्यानंतर सुरेश गव्हांदे जि. संघटक, डॉ अनिल वानखडे जि. सचिव पर्यटन,राहूल हेलोडे ता. कोषाध्यक्ष, बि. डि. हिवराळे,सिताराम तिडके ता. सचिव,यांनी विचार व्यक्त केले.
पुज्य भन्ते राजज्योती आणि पुज्य भन्ते यश थेरो श्रीलंका यांनी उपस्तिथाना धम्मदेसणा/ प्रवचन दिले . पुज्य भन्ते विनयपालजी महाथेरो यांनी श्रामणेर शिबिरार्थीचे विधीवत चिवर उतरविले. शिबिरार्थीनी शुभ्र वस्त्र परिधान केल्यानंतर त्यांना त्रिसरण पंचशिल देण्यात आले. आणि तंतोतंत पालन करण्याचे संदेशदिला.
या श्रामनेर शिबिरात श्रामनेर झालेल्या भिक्खुना के.के. शेगोकार जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी यांच्या हस्ते श प्रमाणप्रत्र वाटप करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी. विनेश इंगळे ता.अध्यक्ष, विशाल हिवराळे ता. सरचिटणीस, एकता मित्र मंडळ खोलखेड,यांनी प्रयत्न केले. तर सुप्रिया महिला संघ खोलखेड येथिल उपासक व उपासिका यांनी श्रामणेर संघाची खुप चांगल्या प्रकारे सेवा केली. दहा दिवसीय श्रामनेर संघाला सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन, संध्याकाळचा फलाहार देणाऱ्या दानदात्यांचे मनःपुर्वक आभार आयोजकांनी व्यक्त केले . समता सैनिक दल प्रितम दामोदर यांनी श्रामणेर शिबिरासाठी दहा दिवस सेवा दिली. त्यांचा विशेष सत्कार याठिकाणी करण्यात आला. या प्रसंगी के. के. शेगोकार जि. अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बुलडाणा उत्तर, दिलिप मेढे जि. उपाध्यक्ष संस्कार, मिलिंद वानखडे जि. सचिव, भावराव गव्हांदे जि. संघटक, अमोल मेढे जि. संघटक, गौतम तिडके ता. सचिव, रमेश गवारगुरू ता. संघटक, अजय इंगळे ता. सचिव, मोतीराम इंगळे ता. हिशोब तपासणीस,श्रिरंग इंगळे ता. सचिव ,भावराव इंगळे, अशोक इंगळे, रविंद्र वानखडे PSI, बाळु मोरे ता. महासचिव वंचित बहुजन आघाडी,. मिलिंद वानखडे ता. सरचिटणीस संग्रामपुर, राजेश इंगळे ता. सचिव शेगांव,राजेश दारोकार केंद्रिंय शिक्षक, अन्नपुर्णा दारोकार, वैशाली राजेश दारोकार, रेवत दारोकार, रजत दारोकार, शेगांव, नांदूरा, संग्रामपुर, जळगांव जामोद, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, आजी, माजी,पदाधीकारी तसेच पंचक्रोशीतील बौद्ध उपासक व उपासिका बालक व बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन विशाल हिवराळे ता. सरचिटणीस भारतीय. बौध्द महासभा खामगांव यांनी केले. तर आभार प्रदर्शन जितेंद्र खंडेराव सरपंच खोलखेड यांनी केले.


