दर्गाह समितीकडून स्वागत, व्यवस्थापनाच्या कार्याचे केले कौतुक
प्रा. कडुबा पैठणे यांनी केली सैलानी बाबा दर्गाहला चादर अर्पण

बुलढाणा (प्रतिनिधी ): जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाण्याच्या हजरत अब्दुल रहमान सैलानी बाबा दर्गाह येथे आज भीम आर्मी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सतीश पवार यांनी सदिच्छा भेट दिली.
सतीश दादा पवार हे दर्गाहमध्ये दाखल होताच दर्गाह समितीच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि शाल-श्रीफळ देऊन जंगी स्वागत केले.
दर्ग्याची सविस्तर पाहणी
यावेळी सतीश दादा पवार यांनी दर्गाह परिसराची सविस्तर पाहणी केली. त्यांनी मजार शरीफला भेट देऊन दुआ केली. देशात शांतता, बंधुत्व आणि सामाजिक एकता अबाधित राहावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
पाहणीदरम्यान त्यांनी दर्गाह समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. येथे येणाऱ्या भाविकांसाठी असलेल्या सोयी-सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.
व्यवस्थापनाच्या कार्याचे केले गौरव
दर्गाहमधील उत्कृष्ट व्यवस्थापन पाहून सतीश पवार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “सैलानी बाबा दर्गाह हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, सर्वधर्म समभाव आणि माणुसकीचा संदेश देणारे केंद्र आहे. लाखो भाविकांची सेवा करणाऱ्या दर्गाह समितीच्या सदस्यांचे कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे दूरदूरहून भाविक येथे येतात
“समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम सैलानी बाबा दर्गाह करत आहे. अशा ठिकाणांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सतीश पवार यांनी दर्गाहमध्ये आलेल्या भाविकांशीही संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दर्गाह समितीने सर्व भाविकांसाठी केलेल्या सोयींबद्दल समाधान व्यक्त केले.
या भेटीदरम्यान भीम आर्मीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच दर्गाह समितीचे सदस्य व प्रामुख्याने समितीचे सचिव एडवोकेट संतोष वानखडे हे उपस्थित होते व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
