Two days of heavy rainfall filled the dam to its full capacity, bringing relief to residents: बुलढाणा शहराची तहान भागवणारे येळगाव धरण 100% भरले
दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले, नागरिकांना दिलासा

बुलढाणा (प्रतिनिधी ): शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ते 100 टक्के भरले असून बुलढाणा शहरवासीयांची तहान आता पूर्णपणे मिटली आहे.
शहरालगत असलेल्या या धरणातूनच बुलढाणा शहराला वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात पाणीटंचाईची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पावसाने हजेरी लावताच परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
पावसामुळे पाणीपातळीत मोठी वाढ ,जिल्ह्यात मागील 48 तासांपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणातील साठा झपाट्याने वाढून आज ते पूर्णपणे भरले आहे.
धरण 100% भरल्याची माहिती मिळताच नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.


