
चिखली/ प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा, वरखेड येथीटक्केविद्यार्थिनी कु. समीक्षा विनोद सपकाळ हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ९६.२५टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून तिची नवोदय विद्यालयासाठी निवड निश्चित झाली आहे. तिच्या या यशामुळे शाळा, पालक, शिक्षक आणि संपूर्ण गावाचा मान उंचावला आहे. या निकालात इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत शाळेची गुणवत्ता अधोरेखित केली आहे. कु. प्रतिक्षा सपकाळ (९५टक्के), तन्मय बंगाळे (९५टक्के), चेतन म्हळसणे (९३.७५ टक्के), कु. जानवी मिसाळ (९२.५०टक्के), वंश शेळके (९१.२५टक्के), लावण्या जवंजाळ (९१.५टक्के), श्रावणी जवंजाळ (९१.२५टक्के), मोहित जोरवार (९१.२५टक्के), अर्णव भगत (९०टक्के), स्वरा मोरे (८५टक्के) तसेच फैजान शेख इस्माईटक्के(८५टक्के) यांनीही उत्तम गुण मिळवत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातीटक्केविद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दटक्केसर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्यांची शाळा म्हणून ओळखली जात असली, तरी अशा यशस्वी विद्यार्थ्यांमुळे तिची उच्च शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, वरखेड शाळेत ‘मिशन नवोदय’ अंतर्गत ‘स्पेशटक्केनवोदय बॅच’ चालवली जाते. या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर नवोदय परीक्षेचे सखोटक्केमार्गदर्शन देण्यात येते तसेच ३० ते ४० सराव परीक्षा घेतल्या जातात. वर्गशिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला असल्याचे मानले जात आहे. यासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. पुढीटक्के२०२७ च्या नवोदय परीक्षेसाठीही शाळेत ‘मिशन नवोदय’ अंतर्गत स्पेशटक्केनवोदय बॅच सुरू करण्यात येणार असून इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.


