mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

New Collector in Buldhana, Dr. Kiran Patil transferred to Pune : बुलढाण्यात नवे जिल्हाधिकारी , डॉ .किरण पाटील यांची पुणे येथे बदली

बुलढाणा  दि.२ एप्रिल ( प्रतिनिधी ) : बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे बदली झाली असून बुलढाणा जिल्हाधिकारी म्हणून नवे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यासंदर्भातील अधिकृत आदेश शासनाकडून प्राप्त झाले असून या बदलामुळे जिल्हा प्रशासनात नवीन नेतृत्वाची सुरुवात होणार आहे.

राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठा बदल करत बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. देवरे यांना पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदावरून बुलढाण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top