
चिखली (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकरखेड( मु) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे शिका संघटित व्हा संघर्ष करा,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरुगुरल्या शिवाय राहणार नाही. यावर्षीची महामानवाची जयंती ही नाचून साजरी तर होतेच परंतु टाकरखेड येथील पंचशील नवयुवक मंडळाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करून महामानवांना अभिवादन करण्याचे आयोजन केले आहे. यामध्ये कोणतेही वयोमर्यादा नसून निशुल्क परीक्षा दि. 12एप्रिल 2026 रविवार वेळ सकाळी 9 ते 10:30 पर्यत मानव प्रगती बुद्धविहार टाकरखेड येथे होणार आहे. परीक्षेचा विषय फुले शाहू आंबेडकर व भारतीय संविधान असणार आहे.
परीक्षार्थींनी सोबत पेन ,पॅड आणणे व परीक्षेसाठी 15मिनटे आगोदर उपस्थित राहायचे आहे. परीक्षेसाठी 10एप्रिल च्या आगोदर 9767923421.8007065484.7887725867.या व्हाट्स अप नंबर वर नाव गाव फोन नंबर टाइपिंग करून नोंदणी करणे आवश्यक आहे.या परीक्षेत 5उमेदवारांना बक्षीस वितरण दि.14एप्रिल रोजी सकाळी 9वाजता करण्यात येणार आहे .दोन विजेत्यांना सामान गुण मिळाल्यास बक्षीसाचे विभाजन करण्यात येईल.प्रथम. बक्षीस हे 3135 ₹ भारतीय संविधान सन्मान चिन्ह, दुसरे बक्षीस 2135 ₹ भारतीय संविधान सन्मान चिन्ह, तृतीय बक्षीस 1135₹ भारतीय संविधान सन्मान चिन्ह, चौथे बक्षीस भारतीय संविधान सन्मान चिन्ह, पाचवे बक्षीस भारतीय संविधान सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तरी या परीक्षेसाठी जास्थित जास्त नोंदणी करण्याचे आव्हाहन पंचशील नवयुवक मंडळाने केले आहे.


