mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Shiv Sena workers’ gathering and grand party entry ceremony in Chikhali; Hundreds of workers publicly join Shiv Sena!:  चिखली येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

चिखली(प्रतिनिधी) : चिखली येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळावा तथा भव्य पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रचंड जल्लोषात पार पडला. हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने तसेच मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तालुका व विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगव्या विचारांना साथ दिली.

या भव्य सोहळ्याला केंद्रीय मंत्री नामदार श्री. प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या वेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री संजयजी सोनार यांचीही उपस्थिती लाभली.

यावेळी संवाद साधताना मी स्पष्टपणे सांगितले की, शिवसैनिकांच्या निष्ठा आणि बांधिलकी हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. “शिवसैनिकांच्या रक्तात कधीच बेईमानी नसते. भविष्यात ज्या ठिकाणी शिवसेना-भाजपा महायुतीचा उमेदवार असेल, त्या ठिकाणी आपण पूर्ण ताकदीने युतीचे काम करू. तसेच ज्या ठिकाणी शिवसैनिकांवर अन्याय होईल, त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभा राहील,” असा ठाम विश्वास मी सर्व कार्यकर्त्यांना दिला.

आगामी काळात खासदार श्री. प्रतापराव जाधव यांना सोबत घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघात “गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” हा संकल्प राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास मा. आमदार श्री. संजयजी रायमुलकर, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा नगरपालिका गटनेते श्री. मृत्युंजय संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख श्री. ओमसिंग राजपूत, श्री. संतोषभाऊ डीवरे, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. ऋषी जाधव, माजी जिल्हाप्रमुख श्री. भास्करराव मोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती. मायाताई म्हस्के, श्रीमती. आशाताई झोरे, महिला आघाडी जिल्हा संघटक श्रीमती. जिजाताई राठोड, महिला आघाडी जिल्हा समन्वयक श्रीमती. अनुजाताई सावळे, श्री. अमोल अंधारे, उपजिल्हाप्रमुख श्री. निलेश गुजर, श्री. शिवाजीबापू देशमुख, श्री. सतीश वाघ, शिवदूत तालुकाप्रमुख श्री. नितीन राजपूत, सरपंच श्री. मनोज लाहुडकर, शहरप्रमुख श्री. आशिष जाधव, शहरप्रमुख श्री. विलास घोलप, श्री. संतोषराव वाकडे, श्री. सुरेशतात्या वाळूकर, श्री. राजेंद्र बघे, सभापती श्री. नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक श्री. बबलू मावतवाल, श्री. निलेश राठोड, श्री. निलेश अंजनकर, श्री. गजानन लांडे पाटील, श्री. अमोल पाटील शिंदे, श्री. संजय अवताडे, श्री. कैलास भालेकर, श्री. अमोल शिंदे, श्री. विश्वासराव खंडागळे, श्री. केवलसिंग ठाकूर, श्री. शरद हाडे, श्री. रामदास चौथनकर, श्री. तुळशीराम काळे, श्री. अक्षय करंडे, श्री. रोहन करंडे, श्री. पिंटू गायकवाड, श्री. गणेश भवर, श्री. विष्णू मेथे, श्री. शिवाजी शिराळे, श्री. राहुल सुरडकर, श्री. गजानन पवार, श्री. विजय शेळके, श्री. विजय काळवाघे, श्री. विठ्ठल जगदाळे, श्री. राम शेळके, श्री. राजेश पवार, श्री. ज्ञानेश्वर खांडवे, श्री. सचिन कोठाळे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट दिसून आले असून, आगामी राजकीय घडामोडींना या कार्यक्रमामुळे नवे वळण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top