
बुलडाणा (प्रतिनिधी): राज्याचे पावसाळी अधिवेशन दरम्यान भूमि मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने 26 जून छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिनी शहरातील छत्रपती शाहू महाराज पुतळ्यासमोर संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाई प्रदीप अंभोरे संस्थापक अध्यक्ष भूमी मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या मार्गदर्शनात सिद्धार्थ चंद्रशेखर धंदरे उद्धव मुळे सर मुळे आ. पवार यांचे उपस्थितीत छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून संघटनेचे बुलढाणा जिल्हा नेते सारंगधर वाकोडे,भरत मुंडे दीपक कस्तुरे गजानन जाधव ज्ञानदेव मिसाळ भगवान गवई शेषराव चव्हाण सलीम भाई रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने संयुक्त संघटनेच्या शासन प्रशासना कडून प्रलंबित मागण्याची कोणती दखल न घेतल्याने महसूल वन व निवासी जमीन पट्टे, शेतकरी व भूमी हिनांचे 100% कर्जमुक्ती, जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या अतिक्रमित जमिनी वरील सौर ऊर्जा प्रकल्पांना स्थगिती द्यावी जिगाव प्रकल्पग्रस्त बाधित अतिक्रमणधारकांना वीस लक्ष प्रति कुटुंब सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात यावे, जिल्हा वन हक्क समिती द्वारा अपात्र ठरवलेल्या व उपविभागीय वन हक्क समितीकडे तथा ग्रामविकास समितीकडे प्रलंबित असलेल्या वन दावेदारांना यावर्षीचे खरीप हंगाम पेरणी व पूर्व मशागत अवजार यंत्राद्वारे करण्यास वनविभागाचा हस्तक्षेप थांबवा,आदी मागण्या निवेदन मा. उपजिल्हा धिकारी यांनी 30 जुलै 2026 ला 4 वाजता जिल्हाधिकारी मागण्या संदर्भात बैठक लेखी पत्र व भ्रमाण ध्वनी आश्वासना मुळे उपोषण सत्याग्रह आंदोलन स्थगित करुन शिष्टमंडळा द्वारे माननीय मुख्यमंत्री मा. जिल्हाधिकारी यांना मा.ठाणेदार बुलढाणा शहर यांच्या मार्फत यांना उपोषण स्थळी निवेदन देण्यात आले.
शासनाने अधिवेशनात व जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्यास मुंबई पावसाळी अधिवेशना वर 6 जुलै रोजी संघटनेचे सत्याग्रह आंदोलन आझाद मैदान येथे सुरु करण्यात येईल असा इशाराही भाई प्रदीप अंभोरे यांनी निवेदन द्वारे दिला आहे. यावेळी महेंद्र गवई राजू काकडे अनिल कांबळे दत्ता पंजरकर अनिल कांबळे शोभाताई झीने आशाताई मोरे कमलबाई वानखडे प्रमिला सुरवशे प्रकाश सोनवणे शत्रुघन मुंडे अंबादास मानकर सिताराम पवार रमनलाल धंदेरेवाल सुरेखा साळवे कमलबाई वानखडे अनिल हिवाळे भगवान पारेकर भीमराव गवई सलीम भाई ब्रिजलाल राठोड सारंगधर टापरे तुळशीराम सोनवणे सुखदेव कटारे सुधाकर वाठोरे तुर्मा पवार रवींद्र काकडे शोभाताई झीने आशा मोरे सुनीता मोरे प्रमिला सुरडकर संतोष पैठणे नागोराव पैठणे मधुकर पैठणे संजय पाटील बाबुराव मांझा माणिकराव खंडारे वसंतराव पवार सखाराम वानखडे श्रीराम वानखेडे मनोहर धुरंदर भास्कर जाधव गोविंदा काळे मारुती भगेवार रवींद्र भारंबे संजय वानखडे तेजराव वानखडे गजानन हसल सुरज खवले रमेश गावंडे फुलचंद साळुंखे काशीराम रिस्वाल प्रल्हाद काकडे राहुल काकडे नामदेव साळवे समाधान गिरी अमोल शिंदे नंदाबाई तायडे विजय चौंडकर भगवान बोरकर शेख सलीम शेख चांद मुरलीधर अंभोरे तेजराव चव्हाण सुलोचना बाई निकम तुळसाबाई बचेरे पार्वती बाई इंगोले विमलबाई बोडखे शशिकलाबाई पैठणी चंदाबाई साळवे सुमन वाकोडे राधाबाई अंभोरे छायाबाई वाकोडे शोभा सुरडकर चंदाबाई साळुंखे सह शेकडो कार्यकर्ते व अतिक्रमण धारक उपस्थित होते.
