मुंडन करून केला निषेध: राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

बुलढाणा (प्रतिनिधी) जंतरमंतर, नवी दिल्ली येथे शांतपणे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींच्या वर झालेल्या कथित अमानवीय लाठीचार्जची स्वतंत्र न्यायिक चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनामा व आंदोलनकर्त्यांवरील सर्व खटले रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनकडून २५ जुलै रोजी लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मारहाणप्रकरणाचा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिध्दांत वानखेडे यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे शांतपणे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानवीय लाठीचार्जमुळे संपूर्ण देशात मोठा आक्रोश आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांतपणे आवाज उठवण्याचा आणि विरोध करण्याचा अधिकार देतो. पण, त्याविरुद्ध ही घटना अत्यंत दुर्दैवपूर्ण आणि लोकशाहीविरोधी आहे. जंतरमंतर लाठीचार्ज प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळेवर चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली केली जावी. दोषी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली जावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. जखमी विद्यार्थ्यांना योग्य उपचार, आर्थिक मदत व न्याय्य नुकसानभरपाई द्यावी. देशभरातील सर्व खटले (एफआयआर) तातडीने रद्द करावीत. भविष्यात शांतिपूर्ण आंदोलनासाठी स्पष्ट दिशा-निर्देश जाहीर केले जावेत. या प्रकरणाची सविस्तर व तथ्यात्मक चौकशी करावी व आवश्यक कारवाई करावा आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या.तसेच लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांची रक्षा करण्यासाठी वरील मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात असेही निवेदनात नमुद आहे. निवेदनावर सतीश पवार , अध्यक्ष भाई प्रकाश धुंदळे, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखडे, सागर मेढे, ॲड.कैलास कदमयांच्यासोबत अर्जुन खरात, प्रा. कडुबा पैठणे, विजय पवार, किरण पवार, सुमित गायकवाड, गुलाबराव गवई, सिध्दांत वानखेडे, भाई प्रकाश धुंदळे,जितेंद्र खंडेराव, सुरेश जाधव, सुरेश डवरे, एस एस डावरे ,समाधान जाधव, सुरेश जाधव ,अनिल शिखरे, विजय पवार, सुधीर भिसे, तानाजी इंगळे ,अमर चव्हाण, पवन जाधव ,आकाश पवार, शुभम पाटील, एड. कैलास कदम, ज्ञानेश्वर, गजानन रोकडे, एड.एस. एस .सुरडकर, जीवन इंगळे,रमेश गवई, वैभव सरकटे, आदित्य वाघमारे ,रोशन शिकारे, शिवा शिकारे,चंद्रशेखर पवार, प्रज्वल पाटील, संकेत, ज्ञानेश्वर गरुड, अनिकेत, नरेंद्र, अजय गोरे, अमोल खंडारे,मधुकर इंगोले, संतोष कळसकर, नाना साळवे, गजानन दांडगे, शुभम, सुमित कंकाळ, सौरभ गवई , रितेश जाधव, विशाल साळवे, विजय बनसोडे, राहुल सिंगारे ,प्रतीक सिंगारे, चेतन अंभोरे ,प्रेम सिंगारे, शांतुल खरात, राजू शिंगारे,आदींसह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. सदर आंदोलनामध्ये देऊळगांवराजा, मोताळा, चिखली, सिंदखेडराजा आदी तालुक्यांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले होते. जिजामाता प्रेक्षागार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढला गेला.
—-
घोषणांनी दणाणला परिसर
भीम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने जंतर-मंतर स्थित घटनेच्या निषेधार्थ नारेबाजी करण्यात आली. मोदी हमसे डरता है पुलिस आगे करता है, इन्कलाब जिंदाबाद, मोदी सरकार हाय-हाय, राजीनामा दो शिक्षामंत्री राजीनामा दो यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो या नार्यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलकांत उत्साह दरवळला.
