Teachers’ constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या नाव नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या ८ हजार ६४८ अर्जांपैकी ५९३ अर्ज अपात्र ठरले आहेत. एकूण पात्र ८०५५ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बुलढाणा : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या नाव नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या ८ हजार ६४८ अर्जांपैकी ५९३ अर्ज अपात्र ठरले आहेत. एकूण पात्र ८०५५ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयांच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी या मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी १ जानेवारी २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याकरिता निवडणूक आयोगाने कार्यक्रम घोषित केला आहे. अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यामध्ये सर्व पात्र शिक्षक मतदारांना नव्याने नाव नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत होती. दिलेल्या कालावधीत नोंदणी साठी प्राप्त झालेल्या अर्जाची नोंदणी करून ३ डिसेंबर रोजी शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली.
१८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेले दावे व हरकती ५ जानेवारी २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येईल तसेच अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२६ रोजी प्रकाशित केली जाईल.
नोंदीत – पात्र – अपात्र
बुलढाणा : १५७५ – २०१
चिखली : ९६१ – ४७
दे. राजा : ४०७ – ४३
सिं. राजा : ४६९ – १७
मेहकर : ९९७ – ३६
लोणार : ४८७ – १७
मोताळा : ३२२ – ०२
मलकापूर : ५८२ – १९
नांदुरा : ३७२ – ०८
खामगाव : ७७३ – १२०
शेगाव : ५५६ – १५
ज.जा. : ३९४ – ४४
संग्रामपूर : १६० – २४


