
चिखली (प्रतिनिधी ):आज शेतकरी संकटात आहे, गावागावात आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत करवंड येथील अष्टविनायक जय कडाई माता मंदिर ट्रस्ट आणि धर्मादाय प्रशासनाने एकत्र येत एक अत्यंत सामाजिक आणि आरोग्यदायी पाऊल उचलले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, करवंड येथील डॉक्टरांनी व सर्व वैद्यकीय टीमने गावकऱ्यांच्या आरोग्याची सखोल तपासणी केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व श्री. अमोलजी कल्योती, धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा मा. श्री. डी. डी. खोंचे, धर्मदाय सह आयुक्त, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अष्टविनायक जय कडाई माता मंदिर, करवंड (रजि. नं. ए-1550) व सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले होते.
या शिबिरास प्रमुख श्रीमती डी. के. साहू, मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, बुलढाणा, श्रीमती आर. आर. बारवडे, मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त, बुलढाणा, श्री. अ. प्र पाटील (अधीक्षक),श्री. ए. आर. गवई (निरीक्षक),श्री. जे. एन. मुसळे (निरीक्षक) स.बा .जोशी.(निरीक्षक)
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले यांचे वडील श्री. अंकुशराव पडघान (संचालक, बुलढाणा जिल्हा बँक) हे उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अष्टविनायक कडाई माता मंदिर समितीचे श्री. रविंद्र अशोक इंगळे( अध्यक्ष) श्री. गणेश बबन तायडे(उपाध्यक्ष) श्री. वसंता बाबुराव घायवट(सचिव)श्री. सुभाष किसन इंगळे(सहसचिव), तसेच संचालक मंडळातील श्री. सुरेश प्रल्हाद पिंवळ, श्री. हिरालाल भाऊराव जाधव, श्री. संतोष बाळू काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.


