mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Minister Girish Mahajan’s omission of Dr. Babasaheb’s name in his speech sparks a wave of anger in the Bahujan community: मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणानामध्ये  डॉ. बाबासाहेबांचे नाव वगळ्यामुळे बहुजन समाजात संतापाची लाट 

चिखली ( प्रतिनिधी)

गिरीश महाजन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री नाशिक हे संविधानिक पदावर असून दिनांक 26 /1/26 रोजी गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाच्या भाषण देत असताना त्यांनी संविधान निर्मिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख जाणून बुजून टाळून बहुजन लोकांच्या अस्मितेला थेट पोहोचवली आहे .मंत्री साहेब यांना कदाचित माहीत नसावे की भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वामुळेच आपल्या भारत देशाला संविधान मिळालेले आहे .गिरीश महाजन मंत्री साहेब यांनी त्यांच्या भाषणामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामा उल्लेख टाळणे म्हणजे त्यांच्या नीच प्रवृत्तीची कल्पना आपणास त्यावरून दिसते.

या घटनेचा  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला आहे .  गिरीश महाजन यांना मंत्री या पदावरून काढण्याबाबत व त्यांना तात्काळ आमदार पदावरून सुद्धा निलंबित करण्याबाबत व मंत्री साहेबांवर ऍट्रॉसिटी कायदा अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात यावा .आहे निवेदन तहसीलदारांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.सदरहून बाब म्हणजे फक्त बहुजनांचा अपमान नव्हे तर भारतीय संविधानाचा सुद्धा अपमान आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल .याची सर्वस्वी जबाबदारी प्रश्न प्रशासनाची राहील अश्या स्वरूपाचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी ता. अध्यक्ष संजय धुरंधर ता. सचिव जितु निकाळजे प्रदीप खंडारे, सुमित जाधव, राजु खंडारे,  सागर आराख,गुलाबराव साळवे,मुकिंदा खरात,समाधान साळवे, राजु मोरे, दिपक साळवे, सतिश पैठणे, राहुल गवई, अमोल गवई, शरद भिसे, दत्तात्रय खरात, मनोज पवार, ईश्वर गायकवाड, ऍड. विजय वानखेडे, दिलीप इंगळे,इ. पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top