mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

नरेंदर कब मिलेंगा सिलेंडर’  चिखली  तहसीलसमोर वंचितचे आंदोलन:When will Narendra get cylinder’ protest of the deprived in front of Chikhli Tehsil

चिखली(प्रतिनिधी ): राज्यभरात सुरू असलेल्या गॅस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामाबद्दल वंचित बहुजन आघाडी चिखली शहर व तालुक्याच्या वतीने सोमवार 6 एप्रिल रोजी चिखली तहसील कार्यालय समोर ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आंदोलकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गैस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा, 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही अट शिथिल करण्यात यावी, काळाबाजार करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी, वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत, सरकारकडून प्रत्येकी दोन किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे, सरकारने सांगावे की परिस्थिती कधी सामान्य होईल? जेणेकरून सामान्य लोकांना या परिस्थितीसाठी तयार राहता येईल. राज्यात अनेक ठिकाणी केवायसी नाही म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही, नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा व जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिली आहे? याची ऑडिट करावे. असे नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सदाशिव खिल्लारे, चिखली शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे, एड. विद्याधर गवई, प्रा.प्रवीण खरात, गजानन धुरंधर, महिला आघाडीच्या मालतीताई निकाळजे, मंदा साळवे, संध्या हिवाळे, यशोदा साळवे, ज्योती हिवाळे, सरिता आराख, सीमा घेवंदे, मंगला भालेराव, नारायण खंडारे,दीपक कस्तुरे, डॉ. संतोष गवई, सखाराम वानखेडे, गुलाब साळवे, मीरा गवई, सखाराम बानखडे, भाई मधुकर मिसाळ, शंकर पंडित, आशय खरात अंबादास जाधव, प्रदीप खंडारे, अरुण हिवाळे, दादाराव भिकाजी, दिगंबर अंभोरे, जितु निकाळजे, बोर्डे, राम अवसरमोल आदी पदाधिकारी यांच्या निवेदनावर सह्या असून त्यांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top