mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Enlightenment program by Bedhundkar poet Govind Polad at Shelodi : शेलोडी येथे बेधुंदकार कवी गोविंद पोलाड यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम 

चिखली (प्रतिनिधी): तालुक्यातील शेलोडी येथे बेधुंदकार कवी गोविंद पोलाड (अमरावती) यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दि.१०.०४.२६ शुक्रवारला सायंकाळी ६.०० वाजता शेलोडी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  प्रबोधनकार,बेधुंदकार कवी गोविंद पोलाड (अमरावती), प्रमुख उपस्थिती  म्हणून प्रा.डॉ. सुभाष राऊत चिखली, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे (ग्रा.प. सदस्य, शेलोडी) उपाध्यक्ष आयु. कैलास गवई राहणार आहेत. शिव, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त  प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी पंचक्रोशीतील धम्म उपासक ,उपासिका बहुजन बांधवांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला हजारोच्या सख्येने उपस्थित रहावे असे आव्हान  सम्राट युवा मंच, शेलोडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top