mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Senior police officers inspect Sayalani Baba Yatra Police administration in action mode: सैलानी बाबा यात्रा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पाहणी , पोलिस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये 

चिखली (प्रतिनिधी ) दि.19: सर्व जाती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा येथे दरवर्षी लाखो भाविक  दाखल होतात. नागरिकांची गैरसोय होऊ नये,  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता प्रशासनाने वेळोवेळी सर्व विभागाच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. दि. 18/02/2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक  श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा श्री. अमोल गायकवाड, रायपूर ठाणेदार निलेश सोळंके, तत्कालीन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सैलानी बाबा यात्रा  मिरवणूकीच्या मार्गाची पाहणी करून ग्रामपंचायत यांना मिरवणूकीच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर  करून  योग्य बंदोबस्त नेमूण कोणतीही दुर्घटना घडू नये या बाबत ठाणेदार निलेश सोळंके यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सैलानी यात्रा बंदोबस्त अधिक सक्षम व सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी दिशा मिळाली असून भाविकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन  करण्यात यावेळी आले आहे.

 पिंपळगाव सरांई येथील सरपंच पती श्री केशव तरमले, पोलीस पाटील रामेश्वर गवते, सैलानी येथील शफिक मुजावर, रशीद मुजावर, पोलीस अंमलदार राहुल जाधव, कळमकर, अख्तर शेख, काझी असे यावेळी उपस्थित होते.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top