mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

The fatal attack on journalist Ramdas Kahale is an assassination of the fourth pillar of democracy – RPI liaison chief journalist Babasaheb Jadhav: पत्रकार रामदास कहाळेवर जीवघेणा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथा स्तंभाचा खुन- रिपाइं संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव 

वाळू वाहतूकदार कंत्राटदाराच्या दडपशाही विरोधात बुलडाणा जिल्हा रिपाइं आठवलेंचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे मार्फत मुख्यमंत्री  यांना निवेदन 

बुलडाणा,(प्रतिनिधी): मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक १९ मे २०२६ रोजी राहेरी (ता. सिंदखेड राजा) येथील वाळू घाटावर बातमीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले स्थानिक पत्रकार रामदास मानसिंग कहाळे (रा. आडगाव राजा) यांच्यावर वाळू वाहतूकदार कंत्राटदार आणि त्यांच्या गुंडांनी मिळून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविधानाने मिडीयाला लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून कायद्यात संविधान निर्मिते डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांना अधिकार दिला आहे की, गोरगरीबांवरील जनतेवरील अन्याय अत्याचार व ईतर काही बेकायदेशीर प्रश्न शासन प्रशासना पर्यंत पोहचवून त्यांना न्याय देण्याचे काम पत्रकार करतो व जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ही लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचा खुन दिसतो लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी केला आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार रामदास कहाळे हे राहेरी येथील वाळू घाटावर सुरू असलेल्या घडामोडींचे वार्तांकन करत होते. मात्र, “आपल्या बेकायदेशीर कारभाराची बातमी का लावता?” याचा राग मनात धरून तेथील वाळू वाहतूकदार कंत्राटदार आणि त्याच्या जमावाने मिळून पत्रकार कहाळे यांना घेरले आणि बेदम मारहाण केली होती.धक्कादायक बाब म्हणजे, किंगाव राजा पोलीस ठाण्यात पीडित पत्रकार रामदास कहाळे यांच्या विरोधातच खोटा गुन्हा दाखल केला आहे. वार्तांकन करणे हा गुन्हा नसताना, अशा प्रकारे माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी कायदेयंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाने या अन्यायकारक घटनेच्या निषेधार्थ  25 मे 2026 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांना प्रत्यक्ष भेटून व जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना निवेदन दिले.

निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. पत्रकार रामदास कहाळे यांना मारहाण करणाऱ्या दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. 

कंत्राटदाराच्या दबावाखाली पत्रकार कहाळे यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा.त्या कंत्राटदार आणि त्यांच्या गुंडानी पत्रकार रामदास कहाळे यांना जिवे मारण्याची धमकी दिली त्या कंत्राटदार व त्यांच्या सोबत असलेल्या गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून कठोरातल्या कठोर कारवाई करावी. 

असे निवेदन रिपाई संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे,जिल्हामहीलाध्यक्षा वंदनाताई वाघ,समाजभूषण भिमरत्न पुरस्कार प्राप्त जेष्ठनेते इंजि.प्रा.भैयासाहेब पाटील, मराठा नेते रामभाऊ शिंदे, विदर्भ नेते संजय वाकोडे,  विदर्भ पॅंथर मुरलीधर गवई, समाजसेवक गजानन ससाने, शाहीर प्रविण जाधव, जिल्हा संपर्क संघटक प्रमुख इंजि.शरद खरात, बुलडाणा तालुकाध्यक्ष केशवराव सरकटे, जिल्हाउपाध्यक्ष इंजि. राजेश सरकटे, इंजि. भास्करराव जाधव, महासचिव विजय साबळे,जिल्हा अल्पसंख्याक आघाडी प्रमुख नबाब मिर्झा बेग यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचे बाळासाहेब आहीरे, हीम्मतराव जाधव, युवाध्यक्ष प्रकाश पाटील, भानुदास शेजूळ, पत्रकार विजय भालमोडे, समाधान सरदार, रमेश पिंपळे, राणा मोरे, राहूल आवसरमोल, आकाशभैया साळवे, सुधीरदादा हिवाळे, विजयराज सपकाळ, भाऊसाहेब वानखडे, जिल्हातील रिपाइं आठवले गटाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

 दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास रिपाइं आठवले गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यांचा काही विपरीत परिणाम झाला तर शासन प्रशासन जबाबदार राहील आसा इशारा रिपाइंच्या वतीने दिला आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top