mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

TET exam cancelled due to paper leak; June 28 exam postponed: TET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द; 28 जूनची परीक्षा पुढे ढकलली

बुलढाणा(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जून 2026 रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 पुढे ढकलली आहे. भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय असल्याने परिषदेने तातडीने हा निर्णय घेतला.

 27 जून रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी धाड टाकली. काही इसमांकडे TET जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सारखे असल्याचे कागद सापडले.

भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने पडताळणी केली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी 27/6/2026 रोजी जाहीर पत्रक काढून स्पष्ट केले की NEET 2026 मधील गैरप्रकार लक्षात घेऊन सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. तरीही ही घटना घडल्याने पारदर्शकतेसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात 1028 केंद्रांवर परीक्षा होणार होती. नवीन तारीख अद्याप जाहीर नाही. सर्व अपडेट्स http://www.mscepune.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.लाखो उमेदवारांच्या तयारीवर याचा परिणाम झाला आहे. नवीन तारीख जाहीर होताच लगेच कळवले जाईल.असे जाहीर प्रगटनात नमूद आहे.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top