बुलढाणा दि.22 (प्रतिनिधी) : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी व भोकर गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
अंत्रीकोळी येथे 860 पशुधन व 1560 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 31 हजार 200 लिटर्स पाणी पुरवठा तसेच भोकर येथे 570 पशुधन व 2534 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 57 हजार 560 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
