mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Gaurav Zhine joins Bhim Army along with hundreds of activists

Expresses faith in Satish Pawar’s leadership; pledges active participation in the struggle for social justice: गौरव झिने यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भीम आर्मीमध्ये प्रवेश

सतीश पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त; सामाजिक न्यायाच्या लढ्यात सक्रिय सहभागाची ग्वाही

बुलढाणा( प्रतिनिधी) : भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गौरव झिने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भीम आर्मी संघटनेत जाहीर प्रवेश केला.  (दि. २ ऑगस्ट) स्थानिक विश्राम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रवेश सोहळ्याला भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार, प्रा. कडूबा पैठणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटात गौरव झिने व त्यांच्या सहकाऱ्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना गौरव झिने म्हणाले की, “सामाजिक न्याय, संविधानाचे संरक्षण, शिक्षण, रोजगार आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी भीम आर्मी सातत्याने संघर्ष करत आहे. राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही भीम आर्मीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून समाजहिताची कामे अधिक जोमाने करू.”

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, “भीम आर्मी ही संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालणारी संघटना आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, युवकांना योग्य दिशा मिळावी आणि अन्यायाविरोधात संघटितपणे लढा उभारावा, यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. गौरव झिने व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात संघटनेची ताकद निश्चितच वाढेल.”

प्रा. कडूबा पैठणे यांनीही आपल्या भाषणात सामाजिक परिवर्तनासाठी युवकांनी संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. संविधानिक मूल्यांचा प्रसार करत समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नव्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या विचारांशी निष्ठा राखून सामाजिक न्यायासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात भीम आर्मीच्या संघटनात्मक बळात वाढ होणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.डॉ. प्रकाश काळे, छगन दादा वानखेडे, बंटी शेजोळ, नितेश मगर, विशाल इंगळे ,अजय गवळी ,चेतन भालेराव ,विवेक देशमुख, वैभव देवकर, भागवत राजपूत ,विजय पवार ,आदित्य टेकाळे, महेश काळे, अनिकेत आराख, शाम राऊत, कुणाल गवई, अक्षय जाधव, सौरभ वाघ, अमित देशमाने ,हर्षल कानडजे ,ऋतिक ,देशमाने, गोपाल, रवींद्र झोनी,अभिषेक वाघ ,चिंतामणी ,अक्षय , शिवम पडोळ ,ऋषिकेश लहाने, किरण , भूषण जाधव ,गोलू भालेराव, समीर हिवाळे, अभिषेक वाणी, अभिषेक जाधव ,अभिषेक जगताप ,आदित्य तांगडे ,दीपक या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश घेतला

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top